जिल्हा प्रशासनाने जिल्हाभर २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. तसेच याकाळात घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले आहे. मात्र अनेकजण जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद न देता खुलेआम घराबाहेर पडत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहन चालकही विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या वतीने अशा दुचाकी चालकांवर कारवाई केली जात आहे. कारवाईनंतर दुचाकी जप्त करण्यात येत असल्याने नागरिक ही वाहने सोडविण्यासाठी शहर वाहतूक शाखा परिसरात गर्दी करीत आहेत.
३० मार्च रोजी शहर वाहतूक शाखा कार्यालयात अनेक वाहनमालकांनी वाहने सोडवून घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र जमा केलेली वाहने लॉकडाऊन नंतरच सोडली जाणार असल्याचे स्पष्ट केले. तरी नागरिकांनी संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार यांनी केले आहे.
फोटो न. १५