शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

औंढा नागनाथ विश्वस्थांच्या बैठकीत विविध ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:20 IST

फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली.ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सव ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थानचे विश्वस्थ व सल्लागार मंडळाच्या बैठकीत उत्सवाच्या अनुषंगाने मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, भाविकांच्या प्राथमिक गरजांवर आधारित उपाययोजना करण्याचा निर्णय मंडळातर्फे घेतला आहे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, गरीब कुटूंबांनाही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेत गरीब कुटुंबातील मुलींचे सामूहिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्याचा निर्णय आ.डॉ. संतोष टारफे यांच्या अध्यक्षतेखाली घेतला. यंदा नागरिकांच्या सूचनेनुसार व त्यांच्याच सहकार्यातून महोत्सव पार पाडण्याची भूमिका मंदिर प्रशासनाने घेतल्याने नागरिकांनी याचे स्वागत केले. तर काही सुचविलेल्या सूचनाही संस्थानच्या वतीने मान्य केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नगराध्यक्षा दीपाली शरद पाटील, उपाध्यक्षा अलका गणेश कुरवाडे, पोनि कुंदनकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वाशिमकर, विश्वस्थ डॉ. किशन लखमावार, डॉ.पुरूषोत्तम देव, अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर, गजानन वाखरकर, विद्याताई पवार, गणेश देशमुख, डॉ. देविदास कदम, आनंद निलावार, डॉ. देविदास खरात, महेश बियाणी, रमेश बगडिया, अ‍ॅड. राजेंद्र अग्रवाल, पंजाब गव्हाण, शरद पाटील, शिवाजी देशपांडे, श्रीपाद दीक्षित, अनिल देव, विजय महामुने, रामराव पाटील, मोतीराम राठोड, सुरेश गिरी, नागनाथ रेणके, नंदकुमार पाटील, वैजनाथ पवार, व्यवस्थापक शंकर काळे, बापूराव देशमुख यांची उपस्थिती होती.समित्या स्थापन : बंदोबस्तही ठेवणारसात दिवस चालणाºया यात्रा महोत्सव काळात भाविकांची गर्दी मोठी असल्याने या काळात गावकºयांच्या मदतीने हा उत्सव पार पाडण्यासाठी आरोग्य समिती, आर्थिक व्यवहार, देखरेख समिती, भोजन समिती, धार्मिक कार्यक्रम समिती, दर्शन व्यवस्था अशा विविध समित्या स्थापन करून यावर नागरिकांच्या नियुक्त्याकेल्या आहेत. तसेच हा उत्सवात ग्रामस्थांनी आपल्या गावाचा उत्सव आहे, असे समजून शांततेत पार पाडण्याचे आवाहन आ.डॉ. संतोष टारफे यांनी केले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी महोत्सवा दरम्यान येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.