शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : गोवर व रुबेला आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : गोवर व रुबेला आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आयोजित गोवर-रुबेला कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, दिलीप बांगर, कल्याणकर, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले, भारत सरकारने २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे. ही मोहीम किमान पाच आठवड्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत असून पहिल्या सत्रात सर्व शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. त्यानंतर शाळेत न जाणारी मुले तसेच ९ महिने ते ३ वर्षापर्यंतची बालके यांच्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाईल. ही मोहीम ९ महिने ते १५ वर्षांआतील मुलांमध्ये यशस्वीपणे पार पाडण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे सर्व शाळांनी नियोजन करावे असे सूचित केले. सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात ही मोहिम शंभर टक्के यशस्वीरित्या राबवू, असा विश्वास जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी व्यक्त केला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे, डॉ. स्नेहल नगरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, ईशी, डी. आर. पारटकर, मुनाफ आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी गोवर-रुबेला कार्यशाळेस हजर होते. सदर मोहीम यशस्वीतेसाठी यावेळी प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले.नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण राज्यभरात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून, या मोहिमे दरम्यान सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंतच्या मुलांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरीता आरोग्य, शिक्षण व समाजविकास या नगरपालिकेच्या विभागांसह विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगातून ही मोहिम प्रभावीरित्या राबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम हाती घेण्याचे ठरविले आहे. ही मोहिम किमान पाच आठवड्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य