शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॉटच्या रजिष्ट्रीसाठी चक्क तहसीलदारांची खोटी स्वाक्षरी व शिक्क्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

वसमत : येथे अनधिकृत एन.ए. करून प्लॉट विक्रीचा प्रकार उजेडात येत असताना गुंठेवारी रजिष्ट्रीसाठी चक्क तहसीलदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या व ...

वसमत : येथे अनधिकृत एन.ए. करून प्लॉट विक्रीचा प्रकार उजेडात येत असताना गुंठेवारी रजिष्ट्रीसाठी चक्क तहसीलदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या व शिक्के वापरल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत एन.ए.च्या नावावर हद्दीबाहेरील सर्व्हे नंबरला नमुना नंबर देण्याचे रॅकेट आहे. तर रजिष्ट्री कार्यालयात बनावट कागदपत्रांद्वारे रजिष्ट्री करणाऱ्यांचीही साखळी असल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी तहसीलदारांनी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

अधिकृत एन.ए. न करता घरबसल्या नकाशे तयार करून त्यालाच एनए ले-आउट भासवायचे व बनावट कागदपत्रांद्वारे व साखळीद्वारे प्लॉटींग करून ग्राहकांना फसवायचे, हा प्रकार वसमतमध्ये जोरात सुरू आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यापासून प्रचंड खळबळ उडाली आहे. अशा बनावट कागदपत्रांद्वारे व रजिष्ट्री कार्यालयातील साखळीद्वारे गुंठेवारी जमिनीची रजिष्ट्री करून या रजिष्ट्रीच्या आधारे गुंठ्यांची नोंद सातबारावर घेण्यासाठी फेरफार करण्याचे प्रकार घडत आहेत. या प्रकाराचा गवगवा झाल्याने आता फेरफार करताना कागदपत्रांची पडताळणी करण्याचे धोरण सुरू आहे. एका प्रकारात गुंठेवारी रजिष्ट्रीसाठी चक्क तहसीलदारांच्या खोट्या सह्या व शिक्के वापरण्यात आल्याचे समोर आले आहे. बोरीसावंत सज्जाचे तलाठी एम. बी. भुसावळे यांच्याकडे परळी येथील ०.०५० आर व ०.०७५ आर जमीन फेरफारसाठीचा प्रस्ताव आला होता. सदर दस्तावेजासोबत जमीन गोठ्यासाठी वापरण्यासाठी खरेदी करायची असल्याने ती जमीन विक्रीची परवानगी म्हणून तहसीलचे प्रमाणपत्र जोडले होते. अर्जदारांनी दस्तनोंदणीसोबत हे प्रमाणपत्र व स्वाक्षरी तहसीलदारांची नसल्याचा संशय आल्याने पडताळणी झाली तर सदर सह्या व शिक्के खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकाराची तहसीलदारांनी गंभीर दखल घेऊन खरेदी व विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश तहसीलदारांनी तलाठ्यांना दिला आहे. खरेदी- विक्री करणाऱ्यांना हे प्रमाणपत्र कोणी दिले, खोट्या सह्या कोणी केल्या, दस्तनोंदणी करताना दुय्यम निबंधकांनी पडताळणी न करता दस्तनोंदणी कशी केली, याचा शोध घेण्याची गरज आता व्यक्त होत आहे. तुकडेबंदी कायद्यानुसार २१ आर जमिनीपेक्षा कमी जमिनीची रजिष्ट्री करणे कायद्याने बंद असताना वसमतमध्ये एक एक गुंठ्याचीही रजिष्ट्री विना दिक्कत होत असते. यासाठी शेत सर्व्हे नंबर ग्रामपंचायतीचा नमुना नंबर आठ व अन्य प्रमाणपत्र सादर करून रजिष्ट्रीचा सपाटा लागला आहे. एनए ले-आउट झालेले नसताना नमुना नंबर आठ देण्याचे प्रकार सुरू आहेत. आता गुंठेवारी रजिष्ट्रीसाठी तहसीलच्या खोट्या प्रमाणपत्राचा प्रकार समोर आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर या प्रकरणातील साखळी उजेडात येण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात तलाठी एम.बी. भुसावळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फेरफारसाठी आलेल्या कागदपत्रासोबत तहसीलचे प्रमाणपत्र होते. या प्रमाणपत्रावर असलेल्या स्वाक्षऱ्या व शिक्का बनावट असल्याचे लक्षात आल्याने तहसीलदारांनी अर्जदाराकडून मूळ दस्तऐवज मागवून चौकशी केली व याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

गुंठेवारी रजिष्ट्री करताना गोठा, रस्ता, बोअर, विहीर, गाडीरस्ता, खरेदी - विक्री परवानगीचे प्रमाणपत्र जोडण्याचे प्रकार वसमतमध्ये सर्रास सुरू आहेत. पूर्णा प्रकल्प विभागाचेही प्रमाणपत्र जोडून रजिष्ट्री होत आहेत. ग्रामपंचायतीच्या नमुना नंबरने प्लॉटिंगच्या रजिष्ट्रीचे प्रकार सुरू आहेत. यातील किती प्रमाणपत्र खरे व किती बनावट असून, याची चौकशी होण्याची गरज आहे. तुकडेबंदी अधिनियम १९४७ च्या अन्वये आठ प्रमाणे २१ गुंठ्याच्या आतील जमिनीची रजिष्ट्री करता येत नसताना दुय्यम निबंधक रजिष्ट्री कशी करत आहेत, याचीही चौकशी होण्याची गरज आहे.