शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी मिळणार गणवेश, पुस्तके

By admin | Updated: May 24, 2014 00:46 IST

मोहन बोराडे, सेलू आगामी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके आणि गणवेश वाटप करण्यासाठी गटशिक्षण विभागाने नियोजन केले

मोहन बोराडे, सेलू आगामी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके आणि गणवेश वाटप करण्यासाठी गटशिक्षण विभागाने नियोजन केले असून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी हे साहित्य वाटपाची तयारी करण्यात आली आहे़ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील मुली तसेच एस़सी़, एस़ टी़ व बी़पी़एलमध्ये समाविष्ठ असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश व सर्व विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके देण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापकांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी एस़ पी़ कुलकर्णी यांनी दिले आहेत़ तालुक्यातील ८ हजार ४२१ विद्यार्थ्यांना गणवेश खरेदीसाठी संबंधित शाळाच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर ३३ लाख ६८ हजार ४००रूपये निधी देण्यात आला आहे़ तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद व अनुदानित शाळांमधून शिक्षण घेणार्‍या २३ हजार १०० विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठयपुस्तके वाटप करण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या इमारतीत दिलेल्या वेळे नुसार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ संगणक प्रपत्रनुसार पुस्तके मोजून घेण्यासाठी मुख्याध्यापकांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ २८ मे ते १० जून या कालावधीत मुख्याध्यापकांना नियोजनासाठी बोलविण्यात आले आहे़ २८ मे रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा सेलू, २९ मे के़प्रा़शा़ कन्या सेलू, ३० मे के़प्रा़शा़ कन्या वालूर, ३१ मे के़प्रा़शा़ चिकलठाणा, २ जून के़प्रा़शा़ गिरगाव बु., ३ जून के़प्रा़शा़ कुपटा, ४ जून के़प्रा़शा़ रवळगाव, ५ जून के़प्रा़शा़ मोरेगाव, ६ जून के़प्रा़शा़ डासाळा, ७ जून नूतन विद्यालय नूतन कन्या, के.बा. विद्यालय, शारदा विद्यालय, झाकीर हुसेन माध्यमिक शाळा, ८ जून रोजी नूतन प्राथमिक, शारदा प्राथमिक, विवेकानंद प्राथमिक, न्यू हायस्कूल, यशवंत विद्यालय, ९ जून रोजी झाकेर हुसेन प्रा़ , शैलेजा प्राथमिक, शांताबाई नखाते प्रा़ आश्रम शाळा, वालूर शांताबाई नखाते माध्यमिक आश्रमशाळा व १० जून रोजी ज्ञानोपासक विद्यालय कुपटा, शांताबाई नखाते विद्यालय देवगाव, क्रांतीसिंह नाना पाटील, नितिन विद्यालय बोरगाव, पांडुरंग विद्यालय, मोरेगाव, नेताजी सुभाषचंद्र विद्यालय पिंपरी, सु़ वि़ चिकलठाणाा, के़ जी़बी़ व्ही़ सेलू व अ़ जा़ निवासी आश्रमशाळा हादगाव या शाळेच्या मुख्याध्यापकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत़ संबंधित मुख्याध्यापक उपस्थित न राहिल्यास व त्या कारणाने विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके प्राप्त न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, अशी गटशिक्षणाधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे़