शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:59 IST

महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहिनीच्या कामांसाठी १ कोटी २८ लाख रूपये खर्च केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहिनीच्या कामांसाठी १ कोटी २८ लाख रूपये खर्च केला जाणार आहे.वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्या अनुषंगाने वर्दळीत बाजाराच्या ठिकाणी महावितरणच्या वीजतारांचा गुंता सर्वांनाच माहित आहे. अनेकदा वीजतारांचे घर्षण होऊन आगीच्या दुर्घटना घडतात. शिवाय पावसामुळेही वारंवार बिघाड होतो. आता गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत खांबावरील वीजतारा नागरिकांना दिसणार नाहीत. हिंगोली शहर सुशोभिकरणच्या दृष्टिकोनातून व गर्दीच्या ठिकाणी वीजतारा उघड्या राहू नयेत, यासाठी आता हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे येत्या पंधरा दिवसांत सुरू केले जाणार आहे. सदर कामासाठी लागणारी परवानगी, सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. तसेच महावितरण व नगरपालिका हे काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करणार आहे.महावितरणच्या ग्राहकांना वीजबील दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रियाआॅनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून सदर तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. शिवाय याबाबत वीजग्राहकांना एसएमएसही पाठविण्यात येईल.ग्राहकांना वीज बिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल अ‍ॅप, ईमेल व ट्विटर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात करता येणार आहे.वीजपुरवठा सुरळीतसाठी विद्युत उपकेंद्र; ३ कोटी खर्च४हिंगोली शहरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरठा खंडितपासून हिंगोलीकरांची लवकरच सुटका होणार आहे. शहरात वीजपुवठा सुरळीत व्हावा यासाठी आता महावितरणने नवीन ३३ के व्ही विद्युत उपकेंद्र उभारले आहे. नवीन खाकीबाबा सबस्टेशनची काम पूर्ण झाले आहे. रेल्वे पटरीच्या पलीकडील विजेचा दाब आता कमी आदर्श महाविद्यालयाजवळील उपकेंद्रावर असेल. तर रेल्वेपटरी अलीकडील शहराचा भाग महावितरणच्या कार्यालयातील खाकीबाबा ३३ केव्ही उपकेंद्रावर राहणार आहे. ३ कोटी रूपये खर्च करून सबस्टेशनचे कामकाज करण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण