शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरीत ७५ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:51 IST

तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात दोन दमदार पाऊस पडले परंतु जलसाठा वाढला नाही. अजूनही विहिरी-नाले कोरडेच आहेत. सध्या ७५ गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. अर्धा अधिक तालुका तहानलेलाच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यात दोन दमदार पाऊस पडले परंतु जलसाठा वाढला नाही. अजूनही विहिरी-नाले कोरडेच आहेत. सध्या ७५ गावांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. अर्धा अधिक तालुका तहानलेलाच आहे.मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पावसाळा सुरु असूनही पाणीटंचाई कायम आहे. सध्या ६६ गावांत ९३ अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीला आलेले आहेत. त्यापैकी ३७ प्रस्तावांना तहसिलदारांची मंजुरी मिळाली आहे. उर्वरित प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ९ गावांत ८ टँकरने पाणीपुरवठा उन्हाळ्यात केला. १५ दिवसांपूर्वी दोन दमदार पाऊस पडले. त्यामुळे सध्या या गावात टँकर बंद करण्यात आले आहेत. पाणबुडी वस्ती, माळधावंडा, शिवणी र्खु, हातमाली, रामवाडी, महालिंगी तांडा, मसोड, कुपटी या गावांना उन्हाळाभर टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. तालुक्याचा साडेचार कोटीची संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रशासनाने मंजूर केला आहे. पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नसल्याचे चित्र आहे.पेरणीतही ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अजूनही विहीरी हातपंप कोरडेठाक पडले आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरीकांची वणवण भटकंती सुरु आहे. १५ जूनपासून शाळा सुरु झाल्या असून अनेक शाळांतही पाण्याची टंचाई जाणवत आहे. ९ गावात पुन्हा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीwater shortageपाणीटंचाई