शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सेनगाव तहसीलमधून दोन टिप्पर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 01:11 IST

येथील तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने बुधवारी मध्यरात्री वाळू चोरी करणारे दोन टिप्पर पकडले होते. मात्र पथक पुढील कारवाईला जाताच तहसीलच्या आवारातून शिपायाला धक्काबुकी करुन दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईच्या भीतीने पळविल्याचा प्रकार घडला आहे.

सेनगाव : येथील तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकाने बुधवारी मध्यरात्री वाळू चोरी करणारे दोन टिप्पर पकडले होते. मात्र पथक पुढील कारवाईला जाताच तहसीलच्या आवारातून शिपायाला धक्काबुकी करुन दोन्ही वाहने दंडात्मक कारवाईच्या भीतीने पळविल्याचा प्रकार घडला आहे.तालुक्यात वाळू चोरीविरोधात तहसीलदार वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिज पथकांची स्थापना केली आहे. तालुक्यातील विविध भागात रात्रीला मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत असल्याने याविरोधात बुधवारी रात्री बाराच्या सुमारास पानकनेरगाव शिवारात गौणखनिज पथक प्रमुख मंडळ अधिकारी जी.जी. धुळे, तलाठी राजकुमार शेळके, नीलेश गुडलवार, महेश गळाकाटू, भास्कर पांडे, संदीप थोरात, एस. डी. मुसळी आदींनी वाळू चोरी करणारे विनाक्रमांकाचे दोन टिप्पर पोलिसांच्या सहकार्याने पकडले.ही वाहने पथकाने तहसीलला आणून लावत शिपायाकडे सुरक्षेची जबाबदारी दिली. पथक कारवाईकरिता गोरेगाव भागात रवाना झाले. पथकाने या भागातही एक ट्रॅक्टर पकडले. तेव्हा दोन्ही टिप्पर तहसीलमधून शिपायाला धक्काबुकी करून पसार झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. यात पथकाने पसार झालेल्या वाहनाचा अहवाल तहसीलदार वैशाली पाटील, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे दाखल केला आहे. यासंबंधी पथक प्रमुख जी.जी. धुळे यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही पसार झालेल्या वाहनाचा अहवाल आपण दाखल केला असून वरिष्ठ अधिकारी पुढील कारवाईचा निर्णय घेतील, अशी माहिती दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारीHingoli policeहिंगोली पोलीस