शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरातील दानपेट्या पळविणारे दोन चोरटे जेरबंद; पाच गुन्हे उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 16:53 IST

आरोपीकडून पाच गुन्ह्यातील ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

हिंगोली : मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील पैसे लांबविणारे दोन चोरटे पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध मंदिरातील दानपेट्या लक्ष करीत त्यातील पैसे पळविण्याचा फंडा चोरट्यांनी  सुरू केला होता. सेनगाव, गोरेगाव, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील विविध मंदिरात चोरीच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला होता. यावेळी सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील दोघांनी दोनपेटी फोडल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यावरून आदिनाथ शिवाजी हानवते, कृष्णा सुर्यभान जुमडे (दोघे रा. आडोळ ता. सेनगाव) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी खैरी घुमट येथील कानिफनाथ मंदिर, कवठा शिवारातील जगदंबा मंदिर, इडोळी येथील जागृत महादेव मंदिर, नांदूरा येथील देवीचे मंदिर, नागमाथा येथील नागमाया देवीचे मंदिरातील दानपेटी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. 

आरोपीकडून पाच गुन्ह्यातील ५७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यांना पुढील तपासासाठी सेनगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोनि उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शिवासांब घेवारे, अभय माकणे, भाग्यश्री कांबळे, सपोउपनि बालाजी बोके, पोना संभाजी लेकूळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, नितीन गोरे, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली