शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या आठ दुचाकीसह दोन चोरटे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आखणी दुचाकी चोरी उघडकीस येण्याची शक्यता हिंगोली : दुचाकी चोरून विक्री करण्यासाठी लपून ठेवलेल्या ...

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आखणी दुचाकी चोरी उघडकीस येण्याची शक्यता

हिंगोली : दुचाकी चोरून विक्री करण्यासाठी लपून ठेवलेल्या आठ दुचाकीसह दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी कळमनुरीतून ताब्यात घेतले. दुचाकी चोरट्यांकडून आखणी दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

हिंगोली, वाशीम, यवतमाळ, नांदेड आदी शहरांतून दुचाकी चोरून कळमनुरी येथील शास्त्री नगरातील बजरंग ऊर्फ आकाश गजानन व्यवहारे याच्या घरासमोरील अंगणात विक्रीसाठी ठेवल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बजरंग ऊर्फ आकाश गजानन व्यवहारे याच्या घरी तपासणी केली. यावेळी हिरो पॅशन प्रो व बजाज डिस्कव्हर कंपनीच्या आठ दुचाकी आढळून आल्या. त्याला आणखी विचारपूस केली असता बजरंग गजानन व्यवहारे व गजानन अशोक सूर्यवंशी (रा. शेंबाळपिंप्री. ता. पुसद) यांनी हिंगोली, वाशीम, नांदेड, यवतमाळ आदी शहरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून, दोघांविरुद्ध उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान, पोलिसांनी दुचाकीच्या मूळ मालकांचा शोध घेतला असता ते बोरी खु. (ता. पुसद), आईना महल इतवारा, नांदेड, नंदीग्राम मार्केट नांदेड, इंदिरा गांधी वाॅर्ड, उमरखेड, मुचंडी (ता. बेळगाव ) येथील असल्याचे समजले तर आखणी तीन दुचाकी मालकांची माहिती मिळू शकली नाही. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहा. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक के.डी. पोटे, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर, शंकर ठोंबरे, विशाल घोळवे, राजू ठाकूर, किशोर सावंत, दीपक पाटील, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, चालक प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.