शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:41 IST

शहरातील नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांच्या साहित्यासह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मूळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शहरातील नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांच्या साहित्यासह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मूळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नागेश्वरनगरमधील त्रिधारा व साई किराणा अशी दोन दुकाने आहेत. मंगळवारी दोन्ही व्यापाºयांनी नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी आपली दुकाने बंद केली. सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याने रस्त्यावर रात्री लवकरच शुकशुकाट पसरतो. नेमक्या याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन्ही दुकानांचे शटर वाकवून दुकानांत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सामानासह चैनीचे साहित्य लंपास केले. तसेच याच भागात असलेल्या दुधाळा व जलालदाभा या तलाठी सज्जा कार्यालयातून दुधाळा गावाचे मूळ दस्तावेज चोरी झाल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच आज सकाळी फौजदार साईनाथ अनमोड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पंचनामा केला आहे. या घटनेत चोरट्यांनी लहान मुलांचा वापर केला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना चोरी करण्यासाठी वापरलेली हत्यारे सापडली. दुकानमालक रवि गायकवाड व नवनाथ राऊत यांच्या दोन्ही दुकानातून जवळपास दीड लाख रुपयांचे साहित्य चोरी झाल्याचे दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे.दोन्ही दुकानांसमोर असलेल्या एका घराबाहेरील सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यास मदत मिळणार असून लवकरच या घटनेचा छडा लागणार असल्याची माहिती फौजदार अनमोड यांनी दिली आहे. तसेच घटनास्थळी आज सकाळी श्वान पथकाला पाचारण केले असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे.