शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी, हिंगोली शहरातील घटना; लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक

By रमेश वाबळे | Updated: February 26, 2023 23:03 IST

या आगीत दुकानातील लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता.

रमेश वाबळे, हिंगोली : शहरातील महात्मा गांधी चौकातील प्रिटिंग प्रेस व संगणक विक्रीच्या दुकानाला आग लागल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास घडली. या आगीत दुकानातील लाखों रूपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता.

तीन- चार दिवसांपासून उन्हाची प्रखरता अधिक जाणवू लागली आहे. प्रखर उन्हामुळे सन्नाटा पहायला मिळत आहे. व्यापारीही दुपारच्या वेळेला सावलीचा आधार घेत ग्राहकांची वाट पाहत आहेत. यातच रविवारी दुपारी ४.३० च्या सुमारास महात्मा गांधी चौकातील ओमप्रकाश मोतीलाल अग्रवाल व विजय मोतीलाल अग्रवाल यांचे हिंद प्रिटिंग प्रेस व ओरियन काॅम्प्यूटर या दुकानांना आग लागल्याची घटना घडली.

पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले होते. दुकानदातून धुराचे लोट बाहेर येत होते. दरम्यान, परिसरातील व्यापाऱ्यांनी घटनेची माहिती नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. यानंतर काही वेळातच हिंगोली अग्निशमनच्या दोन गाड्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचल्या.आग भडकत असल्याचे पाहून सेनगाव व कळमनुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले. त्यानंतर तेथील दोन गाड्या तसेच इतर खासगी चार टॅंकर आग अटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, जवळपास दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग अटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत दोन्ही दुकानाचे लाखों रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविण्यात येत होता. घटनेप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :fireआग