शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दोन क्विंटल प्लास्टिक जप्त : आठ व्यापाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या वतीने शहरात शुक्रवारी प्लास्टिकजप्तीची मोहीम राबविण्यात आली. यावेळी शहरातील आठ व्यापाऱ्यांकडून तब्बल २ क्विंटल प्लास्टिक ...

हिंगोली : येथील नगरपालिकेच्या वतीने शहरात शुक्रवारी प्लास्टिकजप्तीची मोहीम राबविण्यात आली. यावेळी शहरातील आठ व्यापाऱ्यांकडून तब्बल २ क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून २६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हिंगाेली शहरातील काही व्यापारी प्लास्टिकच्या पिशव्या वापरत असल्याची माहिती नगरपालिकेला मिळाली होती. त्यानुसार नगरपालिकेेचे डॉ. अजय कुरवाडे यांच्या पथकाने शहरातील व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी केली. यामध्ये शहरातील ८ व्यापाऱ्यांकडे प्लास्टिक आढळून आले. प्लास्टिक आढळलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथकाने दिली. कारवाई करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांमध्ये के. जी. एन. किराणा दुकान (५ हजार दंड), ओम किराणा दुकान (५०० रुपये), भारत गारमेंट, मोहमद अशरद (५ हजार), जवाहर रामेश्वर मुंदडा किराणा दुकान (२ हजार), अमर कलेक्शन कापड दुकान (२ हजार), लाडली लेडीज वेअर (२ हजार), सुदर्शन नैनवाणी किराणा दुकान (५ हजार), सुनील नैनवाणी किराणा दुकान (५ हजार) यांचा समावेश आहे.

सर्व व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा नगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगरपालिकेने दिला आहे. पथकात मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, सनोबर तसलिम, बाळू बांगर, पंडित मस्के, अमरसिंग ठाकूर यांच्यासह स्वच्छ सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

फोटो नं. १३