शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:04 IST

हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर आॅटोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी लासीना फाटा येथे घडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर आॅटोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ७ जानेवारी रोजी लासीना फाटा येथे घडली होती. अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान अखेर १३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मृत्यू झाला.विद्यासागर विद्यालय खानापुर चिता येथील शिक्षक शिवाजी कोरडे लासिना पाटीवरून हिंगोलीकडे जात असताना आॅटो क्रमांक एमएच-३८-७०२५ च्या चालकाने वाहन वेगात व निष्काळजीपणे चालवून दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातामध्ये कोरडे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. १३ जानेवारी रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दत्ता कोरडे यांच्या फिर्यादीवरून आॅटो चालकाविरूद्ध कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठारशिरडशहापूर : औंढा- वसमत राज्य रस्त्यावर सेंदुरसना पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकजण जागीच ठार झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत नामदेव बाबूराव लेकुळे (२८, रा. कुपटी ता.वसमत) हा तरूण चोंढी आंबा येथील बँकेतून पैसे काढून सेंदूरसना पाटीजवळील शेतात जात असताना भरधाव वेगाने जाणाºया वाहनाने त्यास जोराची धडक दिली. यात नामदेव याच्या मानेस मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यास तात्काळ उपजिल्हा रूग्णालय वसमत येथे नेले असता त्यास डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले. बीट जमादार शंकर इंगोले यांनी पंचनामा केला. कुरूंदा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.