शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

औंढ्यात बॅग कापून पळविले सव्वा लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:42 IST

येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यवस्थापकाची पैशांनी भरलेली पिशवी खालून ब्लेडने कापून १ लाख २४ हजार ८०० रुपये पळविल्याची घटना सोमवारी सकाळी ११.४५ वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या व्यवस्थापकाची पैशांनी भरलेली पिशवी खालून ब्लेडने कापून १ लाख २४ हजार ८०० रुपये पळविल्याची घटना सोमवारी सकाळी ११.४५ वाजता घडली.औंढा नागनाथ येथील मंदिर पार्किंग परिसरात भक्त निवासमध्ये असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत श्रीकृष्ण होंडा शोरूमची रक्कम भरण्यासाठी व्यवस्थापक शेख इम्रान शेख खदीर (रा. औंढा) हे बँकेत पैशाने भरलेली पिशवी घेऊन गेले होते. रांगेमध्ये उभे असताना अज्ञात चोरट्यांनी सदरील बॅग खालच्या भागातून ब्लेडच्या साह्याने कापली. त्या पिशवीतील एकूण १ लाख ९२ हजार ७०० रुपयांपैकी १ लाख २४ हजार ८०० रुपये काढून घेतले. पैसे रोखपाल यांना मोजून देण्यासाठी बॅग वर धरल्यानंतर ती फाटलेली असल्याचे पाहून रक्कम मोजल्याने कमी असल्याचे निदर्शनास आले. यावेळी ही बाब शेख इम्रान यांनी बँक व्यवस्थापक सुभेदार यांना सांगितली असता त्यांनी शाखेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने चोरी झाल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोनि कुंदनकुमार वाघमारे, जमादार शेख अफसर, इम्रानखान पठाण यांनी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. व्यवस्थापक शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. चोरी करणारे तरूण असून ते लवकरच ताब्यात घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी तीन पथके स्थापन केली आहेत. बँकेत या अगोदर छोट्या चोरी करून रक्कम पळविल्याच्या घटना घडल्या आहेत; परंतु संबंधितांनी फिर्याद न दिल्याने दाखल झाल्या नाहीत. यातील आरोपी लवकरच पकडू, असे पोनि कुंदनकुमार वाघमारे यांनी सांगितले.वसमतमध्ये पुन्हा पकडला गुटखावसमत : शहर पोलिसांनी जवाहर कॉलनी भागात छापा मारून सव्वा लाखांच्या गुटख्यासह विक्रेत्याला ताब्यात घेतले. सण, उत्सवाच्या काळात हमखास गुटख्याच्या साठ्याची उलाढाल वसमतमध्ये करण्याचे धोरण गुटखा तस्करांचे आहे. मात्र शहर पोलिसांच्या छाप्याने तस्करांच्या तंबूत खळबळ उडाली आहे. शहरात गुटखा तस्करांच्या अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत. वसमत शहर पोलीस गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच शहरात गुटखा साठा झाल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक आर.आर.धुन्ने, पोलीस उपनिरीक्षक सदानंद मेंडके आदींच्या पथकाने लगोलग जवाहर कॉलनीत छापा मारला. यात सव्वा लाखाचा गुटखा व गुटखा विक्रेता नावेद हा पोलिसांच्या तावडीत सापडला. जप्तीची कारवाई झाल्यानंतर दुसरा दिवस उजडला तरी अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी तक्रार व पंचनाम्यासाठी वसमतमध्ये दाखल नाहीत. या पूर्वीही याच भागात गुटख्याचा साठा अनेकदा जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या पथकाने पंधरा दिवसांपूर्वी सव्वातीन लाखांचा गुटखा वसमतमध्ये पकडला होता. मात्र तरीही गुटखा विक्रेते व गुटखा तस्कर बिनधास्त आहेत. गुटखा तस्करीला काही तथाकथित पदाधिकाऱ्यांचे पाठबळ आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी