शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीच्या मोंढ्यात तुरीने गाठला ११ हजारांचा पल्ला

By रमेश वाबळे | Updated: August 25, 2023 18:42 IST

उत्पादनात घट झाल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मागील सात महिन्यात मोंढ्यात तुरीची आवक कमीच राहिली.

हिंगोली : अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. परंतु, बाजारपेठेत तुरीला चांगला भाव मिळाला. हिंगोली कृउबाच्या मोंढ्यात २५ ऑगस्ट रोजी तुरीने ११ हजारांचा पल्ला गाठला आहे.

जिल्ह्यात तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ४५ हजार ३०६ हेक्टर असताना २०२२-२३ च्या खरीप हंगामात ३८ हजार ४१८ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यातच अतिवृष्टी, किडीचा हल्ला झाल्याने उत्पादन निम्म्या खाली आले होते. त्यामुळे हंगामापासून मोंढ्यात विक्री येणाऱ्या तुरीची आवक कमी राहिली. परिणामी, समाधानकारक भाव मिळाला. प्रारंभी सात ते आठ हजार रूपये क्विंटलप्रमाणे तुरीची विक्री झाली. त्यानंतर आवक कमी होताच दर वधारले आणि जून, जुलैमध्ये तुरीने दहा हजाराचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर आता तुरीच्या दरात आणखी वाढ झाली असून, २५ ऑगस्ट रोजी मोंढ्यात किमान १० हजार ५५० ते कमाल ११ हजार १५० रूपये तुरीला दर मिळाला. या दिवशी ३० क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती.

आवक मंदावताच भाव वधारला...उत्पादनात घट झाल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत मागील सात महिन्यात मोंढ्यात तुरीची आवक कमीच राहिली. त्यामुळे यंदा तुरीला समाधानकारक भाव मिळाला. हंगामात १०० ते १५० क्विंटल तूर विक्रीसाठी येत होती. तर आता केवळ ३० ते ३५ क्विंटल तुरीची आवक होत आहे. त्यामुळे भाव वधारत आहेत.

हरभऱ्याच्या दरात वाढ...शासनाने हमीभाव केंद्रावर हरभऱ्याला ५ हजार ३३५ रूपये दिला. तर मोंढ्यात आणि खुल्या बाजारात त्यापेक्षाही कमी दर मिळत होता. आता मात्र हरभऱ्याचे दर वाढले असून, २५ ऑगस्ट रोजी १३० क्विंटलची आवक झाली होती. ५ हजार ५०० ते ५ हजार ७५५ रूपये दर मिळाला. तर सरासरी ५ हजार ६२७ रूपये क्विंटलने हरभरा विक्री झाला.

हळदीची १ हजार ८०० क्विंटल आवक...तीन दिवसांच्या बंद नंतर २४ ऑगस्टपासून हळद मार्केट यार्ड सुरू झाले. पहिल्या दिवशी १ हजार ५०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. तर दुसऱ्या दिवशी २५ ऑगस्ट रोजी १ हजार ८०० क्विंटल हळदीची आवक झाली. सरासरी १५ हजार ६५० रूपये दर मिळाला.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोली