शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक समता रुजविण्याचा प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:32 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले. सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ८ एप्रिल रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याचे महान कार्य केले. सर्व नागरिकांनी समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन आ. तान्हाजी मुटकुळे यांनी ८ एप्रिल रोजी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहात केले.येथील सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन आ. मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, जात पडताळणी उपायुक्त भारत केंद्रे, जात पडताळणी समिती सदस्य सचिव छाया कुलाल, दलितमित्र संघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार, मधुकर मांजरमकर, बबन मोरे, बबन शिखरे, दत्ताराव पाटोळे आणि समाज कल्याण सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण उपस्थित होते. मुटकुळे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दूरदर्शीपणे व गांभीर्याने नमूद केली आहे. कलम ४६ मध्ये ‘राज्य हे दुर्बल तर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्यायावर सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे सरंक्षण करील’ असे नमूद केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे दलित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांना समानतेचा हक्क प्राप्त करुन दिला असे ते म्हणाले. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, बबन शिखरे, डॉ. विजय निलावार यांनीही मार्गदर्शन केले. समाज कल्याण सहायक आयुक्त चव्हाण म्हणाले राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले असून, प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत अधिकाराची जाणीव असणे आवयश्यक आहे. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन इंगोले यांनी केले. आभार वागतकर यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी, अधिकारी-कर्मचारी नागरिक उपस्थिती होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूतां तर्फे जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत.समाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून समतादूतांकडून सप्ताहात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शैक्षणिक वाटचाल डीव्हीडी महाविद्यालयात दाखविण्यात येणार आहे. महिलांसाठी (हिंदू कोड बिल) व शेतकºयांसाठीचे योगदान यासह विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सप्ताहामध्ये जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, समतादूत अशोक इंगोले, सुरेश पठाडे, प्रफुल्ल पट्टेबहादूर, शंकर पोघे, सुकेश कांबळे परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक