शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दोन शासकीय कार्यालयांसह ट्रक जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:35 IST

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथे राष्टÑीय महामार्गावर अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथे आलेल्या आ. रामराव वडकुते यांना भाषण करण्यास मज्जाव केला व तेथून हुसकावले. दाती फाटा येथे एक ट्रक जाळून टाकला. एरिगेशन कॅम्प येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय डिव्हीजन चारमध्येही काही जणांनी तोडफोड केली. पेट्रोल टाकून संगणक संच जाळून टाकले. रस्त्यावर टायर जाळले. झाडे तोडून टाकून रस्ता वाहतूक बंद केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथे राष्टÑीय महामार्गावर अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथे आलेल्या आ. रामराव वडकुते यांना भाषण करण्यास मज्जाव केला व तेथून हुसकावले. दाती फाटा येथे एक ट्रक जाळून टाकला. एरिगेशन कॅम्प येथील उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय डिव्हीजन चारमध्येही काही जणांनी तोडफोड केली. पेट्रोल टाकून संगणक संच जाळून टाकले. रस्त्यावर टायर जाळले. झाडे तोडून टाकून रस्ता वाहतूक बंद केली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानकासमोर नांदेड- हिंगोली महामार्गावर तब्बल अडीच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या रास्तारोको आंदोलनादरम्यान आ. रामराव वडकुते तेथे आले. भाषणासाठी त्यांचे नाव पुकारताच आंदोलकांनी एकच गोंधळ घालून त्यांना भाषण करण्यास मज्जाव केला. आंदोलक त्यांच्या अंगावर धावून गेले. जमावातून त्यांना पोनि व्यंकटेश केंद्रे, बाबूराव वानखेडे, देवराव पाटील यांनी बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यानंतर आ. वडकुते यांना धक्काबुक्की झाल्याची अफवा पसरली.दरम्यान, दाती फाटा येथे भर रस्त्यावर एक ट्रक पेटवून दिला ट्रक क्र. आर.जे. ०४ जी.ए. ७१८८ हा ट्रक पूर्ण जळून खाक झाला. आंदोलनस्थळी कळमनुरी अग्नीशमन दलाची गाडी उभी होती. तातडीने गाडी तेथे पाठवली. आग विझवण्याचा प्रयत्न केला. आखाडा बाळापूर येथील एरिगेशन कॅम्प येथे असलेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालय विभाग क्र. ४ च्या कार्यालयात दहा ते पंधरा जण तोंडाला बांधून आले. तेथे उपस्थित चार ते पाच कर्मचाऱ्यांना तलवारी दाखवून कार्यालयाबाहेर काढले. मोबाईल बंद ठेवण्याचे आदेश दिले. कार्यालयाच्या खिडकीच्या काचा, टेबालावरील काचा फोडल्या, सामानाची तोडफोड केली. बाटलीत आणलेले पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यात संगणक संच व इतर सामान जळून खाक झाले.डीवायएसपी शशिकिरण काशिद, पो.नि. व्यंकटेश केंद्रे, सपोनि ओमकांत चिंचोलकर, फौजदार तानाजी चेरलेसह ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी, एस.आर.पी. जवानांची एक तुकडी, राखीव पोलिसांची तुकडी, होमगार्ड असा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी ठेवला होता. पण पोलिसांनापाणी संपले : ट्रक जळून खाकदाती फाट्यावर ट्रक विझवण्यास कळमनुरी अग्निशमन दलाची गाडी आली. पण गाडीत थोडेसेच पाणी होते. ते तेव्हाच संपले अन् आग सुरूच राहिली. अग्निशमन दलाचा हा भोंगळ कारभार चर्चेचा विषय बनला. ही गाडी शोभेची वस्तू बनलीय. यामुळे पोलिसांनाही डोक्याला हात लावून बसावे लागले.साळवा फाटा येथे रस्त्यावर झाड तोडून टाकून वाहतूक अडविली. बाळापुरात पेट्रोलपंपाजवळील पुलावर टायर जाळले. रास्तारोकोत गुंतवत ठेवून इतरत्र जाळपोळ, तोडफोड केली. हा गनिमी कावा पोलिसांच्या लक्षात न आल्याने हिंसक घटना घडल्या.रास्तारोको आंदोलनादरम्यान आंदोलकांनी फडणवीस सरकारचे श्राद्ध घातले. श्रद्धांजली अर्पण केली. अनेक आंदोलकांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला. आंदोलकांनी तीव्र भावना व्यक्त करून आरक्षण द्या, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला.उडी मारली म्हणून जीव वाचला -मो.ताहेरआखाडा बाळापूर : हैदराबादवरून दिल्लीकडे माल भरून जात असताना दाती फाट्याजवळ आठ ते दहा जणांच्या जमावाने आमची गाडी थांबवली. खाली उतर अशी धमकी देत गाडीच्या काचा फोडायला सुरुवात केली. गाडीची कागदपत्रे घेऊन खाली उतरतो, असे म्हणालो. ही फाईल बाहेर काढेपर्यंत दोघांनी बॉटलमधले पेट्रोल गाडीवर टाकले. थोडेशी माझ्या अंगावरही पडले. मात्र आगपेटीवर काडी पेटत नव्हती. तोपर्यंत मी ट्रकमधून उडी मारली आणि स्वत:चा जीव वाचवला. क्षणार्धात ट्रकने पेट घेतला. आतील मेटलचा मालही जळून खाक झाला, ही घटना सांगितली आहे जळीत ट्रकचा ड्रायव्हर मोहम्मद ताहीर याने. ताहीर हा हरियाणा येथील रहिवासी असून दिल्लीच्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये तो ड्रायव्हर म्हणून काम करतो.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMorchaमोर्चा