शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला; एका मजुरासह ८० मेंढ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 12:16 IST

Eighty sheep killed in an accident : राजस्थानातून एक ट्रक (क्र.एमपी-33-एच 7455) 180 मेंढ्या घेऊन हैदराबादकडे निघाला होता.

ठळक मुद्देकोळसा येथील नागरिकांनी पाच जणांना वाचवले

सेनगाव ( हिगोली ) : हिंगोली ते रिसोड मार्गावर कोळसा शिवारात राजस्थानातून हैदराबादकडे मेंढ्या घेऊन जाणारा ट्रक शनिवारी ( दि.२१ ) पहाटे चार वाजता उलटला. या अपघातात ट्रक मधील एका मजूराचा मृत्यू झाला असून ८० मेंढ्याही दगावल्या आहेत. तर गावकऱ्यांच्या सतर्कतेने पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. घटनास्थळी सेनगाव पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सेनगाव येथे पाठविले आहे. ( The truck overturned as the driver lost control; Eighty sheep, including a laborer, were killed near Sengaon of Hingoli District ) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातून एक ट्रक (क्र.एमपी-३३ -एच ७४५५ ) १८० मेंढ्या घेऊन हैदराबादकडे निघाला होता. या ट्रकमधे पाच मजूर देखील होते. ट्रक आज पहाटे चार सुमारास हिंगोली ते रिसोड मार्गावर कोळसा शिवारात आला असतांना चालक सत्येंद्रसिंह चव्हाण (रा. मध्यप्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या खाली जाऊ उलटला. यावेळी मोठा आवाज झाल्याने कोळसा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी अपघातात किरकोळ जखमी झालेल्या चालकासह पाच मजुरांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, अमरसिंह (५०, रा. टोक, राजस्थान) या मजुराचा मृत्यू झाला. अमरसिंह हा ट्रकमधे मागील बाजूस बसला होता. मेंढ्याखाली दबून गुदमरून तो ठार झाला. अपघातात ट्रकमधे असलेल्या १८० पैकी ८० मेंढ्याही दगावल्या आहेत. 

या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक अभय माकणे, जमादार कामाजी झळके, एस. डी. नरवाडे यांनी भेट दिली आहे. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सेनगाव येथे पाठविले आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोलीAccidentअपघात