शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

उपचार दूरच, घाणअन् दुर्गंधीनेच रुग्ण हैराण; आ. मुटकुळेंनी रुग्णालय प्रशासनाला धरले धारेवर

By रमेश वाबळे | Updated: August 14, 2023 17:31 IST

हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी भेट दिली.

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पिण्याच्या पाण्यावरूनही रुग्णांमध्ये ओरड सुरू आहे. याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचाराआधी घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने नाराजी पुढे येत आहे. यावरून १४ ऑगस्ट रोजी आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.

हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात सोमवारी सकाळी आमदार तानाजी मुटकुळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात असलेल्या रुग्णांशी संवाद साधून आरोग्य सेवेची चौकशीही केली. यादरम्यान काही रुग्णांनी पिण्याच्या पाण्यावरून नाराजी व्यक्त केली. काही वेळा पाणी उपलब्ध नसल्यामुळे विकत आणावे लागत असल्याचे सांगितले. तसेच आरोग्यसेवेबाबतही तक्रारी केल्या. यादरम्यान रुग्णालयाच्या परिसरातील स्वच्छतेच्या प्रश्नावरून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आजारापेक्षा घाण आणि दुर्गंधीचाच अधिक त्रास होत असल्याचे म्हणणे रुग्णांच्या नातेवाइकांनी आ. मुटकुळे यांच्याकडे मांडले. त्यावर रुग्णालयातील स्वच्छता, पाणीप्रश्न तसेच आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आमदार मुटकुळे यांनी केल्या. यावेळी त्यांनी रुग्णालय परिसराची पाहणीही केली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. बालाजी भाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

रस्ताकामासाठी अंदाजपत्रक तयार करा...जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी गिट्टी उखडली असून, काही ठिकाणी पावसाचे पाणीही साचत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते तर काही भागात पेवर ब्लाॅक बसविणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर आमदार मुटकुळे यांनी रस्त्याची पाहणी करून अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

टॅग्स :Hingoliहिंगोलीhospitalहॉस्पिटल