शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांच्या मालकांना वाहतूक शाखेची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 00:16 IST

शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यासंबंधी लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच वाहतूक शाखेचे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी एका व्हिडीओद्वारे मोकाट गुरांच्या मालकांना गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे. विशेष म्हणजे हा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून राज्यभरात त्याचे कौतुक होत आहे.हिंगोली शहरात जवळपास पाचशेवर मोकाट जनावरे आहेत. गतवर्षी पालिकेने या जनावरांना कोंडवाड्यात कोंडले होते. तेव्हा सदरील पशुपालकांनी जनावरांना सोडविण्यासाठी पालिकेकडे धाव घेतली होती. परंतु दंड आकारुन या जनावरांना सोडून देण्यात आले. यातील निम्मी जनावरे मोकाट असल्याने त्यांना सोडविण्यासाठी कुणीही आले नाही. त्यामुळे पालिकेने या जनावरांचा काही दिवस सांभाळ करुन त्यांना पुन्हा शहरात सोडून दिले होते. या पशुपालकांवर कडक कारवाई न केल्याने त्यांनी पुन्हा ती जनावरे शहरात सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्यासह भाजी विक्रेते, व्यापारी व नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.शहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. ही जनावरे अचानक वाहनासमोर आल्याने अपघात होतात. वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत आहे. पोलीस मोकाट जनावरांच्या मालकांवर गुन्हा दाखल करु शकतात, हे अनेकांना माहित नाही. या व्हीडीओद्वारे जनावरांच्या मालकांना माहिती दिली आहे. जनावरांच्या मालकांना एका आठवड्याचा वेळ दिला आहे. तरीही जनावरे रस्त्यावर दिसून आल्यास संबंधितांविरूद्ध थेट गुन्हे दाखल केले जातील.- ओमकांत चिंचोलकर, सपोनि वाहतूक शाखा, हिंगोलीही तर न.प.ची जबाबदारीसदरील पशुपालकांनी आपआपले जनावरे ताब्यात न घेतल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा इशाराही या व्हिडीओद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील पशुपालकांचे धाबे दणाणले आहेत. या जनावरांच्या मालकांची माहिती नसल्यामुळे या व्हीडीओद्वारेच नोटीस देत असल्याचे चिंचोलकर यांनी म्हटले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र पालिकेने या बाबतीत हात झटकले आहेत. या जनावरांच्या मालकांची यादी पोलिसांना देण्यास पालिका विलंब करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस