शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

‘संपूर्ण स्वच्छता’ला १७ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:49 IST

जि.प.च्या संपूर्ण स्वच्छता अभियानात गतवर्षी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. मात्र त्यातील जवळपास ४१ हजार १९४ शौचालयांच्या बांधकामाचे प्रोत्साहन अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळाले नाही. रखडलेल्या ४९.३९ कोटींपैकी केवळ १७ कोटी मिळाले असून ते फोटो अपलोडिंग केलेल्या पंचायत समित्यांना प्राधान्याने वितरित केले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जि.प.च्या संपूर्ण स्वच्छता अभियानात गतवर्षी जिल्हा हागणदारीमुक्त करण्यात आला. मात्र त्यातील जवळपास ४१ हजार १९४ शौचालयांच्या बांधकामाचे प्रोत्साहन अनुदान अजूनही लाभार्थ्यांना मिळाले नाही. रखडलेल्या ४९.३९ कोटींपैकी केवळ १७ कोटी मिळाले असून ते फोटो अपलोडिंग केलेल्या पंचायत समित्यांना प्राधान्याने वितरित केले जाणार आहेत.या योजनेसाठी राज्य व केंद्र शासन निधी देते. केंद्र शासनाकडूनच हे १७ कोटी मिळाले आहेत. तर राज्य शासनाचा वाटा मिळणे बाकी आहे. केंद्राकडून अजूनही जवळपास १७ कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. तर राज्य शासनाची डीपीसीतून ७ कोटी तर समाजकल्याणमार्फत ४ कोटी रुपये देण्याची तयारी सुरू आहे. मात्र या दोन्ही बाबींचे प्रस्ताव अजून अंतिम टप्प्यातच आहेत.हिंगोली जिल्ह्यात सर्व तालुक्यांत मिळून एकूण ७७ हजार ४00 शौचालयांचे बांधकाम करण्यात आले आहे. यापैकी ३६ हजार २0६ शौचालयांचे अनुदान लाभार्थ्यांना अदा केले. तर ४१ हजार १९४ लाभार्थ्यांचे अनुदान थकले आहे.\पं.स.ला वर्ग करा : उपाध्यक्षांचा आदेशहिंगोली जिल्ह्याला संपूर्ण स्वच्छता अभियानात केवळ १७ कोटी मिळाले आहेत. या निधीचे वितरण पंचायत समिती स्तरावर लवकरात लवकर करण्याचे आदेश जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे यांनी दिले आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत हा निधी पं.स.ला वर्ग होईल, असे सांगण्यात आले.प्रोत्साहन अनुदानाचा निधी रखडल्याने मागील वर्षभरापासून लाभार्थी पंचायत समितीत खेटे मारत आहेत. आता अपुराच निधी आला. तोही बांधकाम फोटो अपलोडिंगप्रमाणे वितरित होणार असल्याने अनेक पंचायत समित्यांची गोची होणार आहे.जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती करून शौचालय बांधकाम तर झाले. मात्र वापरच होत नसल्याची बोंब सगळीकडेच होत आहे. त्यामुळे यावर पुन्हा प्रशासनाने कारवाई करण्याची गरज असून अन्यथा अनुदान परत घेतले पाहिजे.तालुकानिहाय आवश्यक निधीबांधलेली अनुदान अनुदान लागणारातालुका शौचालये वितरित शिल्लक निधी(कोटी)औंढा ११९0१ ७४३८ ४४६३ ५.३५वसमत १७१0६ ७७0३ ९४0३ ११.२८हिंगोली १२६३२ ५00९ ७६२३ ९.१४कळमनुरी १८0९४ ७३८६ १0७0८ १२.८४सेनगाव १७६६७ ८६७0 ८९९७ १0.७९

टॅग्स :HingoliहिंगोलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान