स्वच्छतागृहे मोडकळीस; जि.प. शाळांना निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:28 AM2021-02-14T04:28:01+5:302021-02-14T04:28:01+5:30

तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या हिंगोली १६६, सेनगाव १६७, वसमत १८९, कळमनुरी २००, औंढा १५७ अशी आहे. शाळांमधील स्वच्छतागृहांसाठी ...

Toilets in disrepair; Z.P. The schools did not receive funding | स्वच्छतागृहे मोडकळीस; जि.प. शाळांना निधी मिळेना

स्वच्छतागृहे मोडकळीस; जि.प. शाळांना निधी मिळेना

Next

तालुकानिहाय जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या हिंगोली १६६, सेनगाव १६७, वसमत १८९, कळमनुरी २००, औंढा १५७ अशी आहे. शाळांमधील स्वच्छतागृहांसाठी केंद्र शासनाकडून मागील अनेक वर्षांपासून निधी दिला जातो. मात्र यासाठी युडायसवर शाळेची व तेथील सुविधांची नोंद आवश्यक आहे. यात दुरुस्तीची गरज असल्यास त्याचीही नोंद करावी लागते. त्यानुसार केंद्र शासन निधी मंजूर करते. मात्र एकाच वेळी सर्व शाळांना निधी शक्य नसल्याने टप्प्या टप्प्याने एवढी कामे झाली आहेत. आता दुरुस्तीला आलेल्या कामांसाठी मात्र निधी मिळत नसल्याने अडचण आहे. यासाठी किमान ५० लाखांपर्यंतचा निधी लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी जि. प.कडून यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र त्याला मंजुरी मिळाली नाही. मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. शिवाय विद्यार्थीसंख्येनुसार काही शाळांमध्ये एकापेक्षा जास्त स्वच्छतागृहांचीही व्यवस्थ करण्यात आलेली आहे. त्यामुळे काही तालुक्यांत शाळांच्या संख्येच्या तुलनेत स्वच्छतागृहांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. हिंगोली जिल्ह्यात काही शाळांमध्ये स्वच्छतागृहच नाही. काही लहान शाळांमध्ये हा प्रश्न असून, काही ठिकाणी शासनाकडे प्रस्तावच न गेल्याचा परिणाम आहे. एकंदरीत हिंगोली जिल्ह्यात स्वच्छतागृहांसाठी शाळांना निधी मिळण्याची गरज असून, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

वारंवार निधीची मागणी

जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या मोठी आहे. त्यांच्या दुरुस्तीसह नवीन कामे, स्वच्छतागृह दुरुस्ती आदी कामांसाठी शासनाकडे वारंवार प्रस्ताव पाठविले जातात. मात्र निधी मिळत नसल्याने अडचण होते, असे जि. प. अध्यक्ष गणाजी बेले यांनी सांगितले.

आठ शाळांमध्ये स्वच्छतागृहच नाही

तांत्रिक चुका, जागेची अडचण आदी कारणांमुळे जवळपास आठ ते दहा शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे बांधकामच झालेले नाही. अशा ठिकाणच्या मुलांना लघुशंका अथवा प्रात:विधीसाठी उघड्यावर अथवा घरी शाैचालयास तेथे जाण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. मात्र सध्या सर्व शिक्षामध्ये अशा कामांसाठी निधी मिळत नसल्याने नवीन कामे करण्यात अडचणी आहेत.

तालुका एकूण स्वच्छतागृहे दुरवस्था झालेली

स्वछतागृहे

हिंगोली ६६७ ५४

सेनगाव ५४७ ३९

वसमत ६६८ ८२

कळमनुरी ६६८ २४

औंढा ५०४ २९

Web Title: Toilets in disrepair; Z.P. The schools did not receive funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.