लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सर्वदूर तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर ७ जुलै रोजी जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, औढा, वसमत सह केंद्रा बु., कडोळी, बाळापूर, नांदापूर, साटंबा, बासंबा, गोरेगाव, आखाडा बाळापूर, कडोळी, खुडज, वारंगा फाटा, जवळा बाजार, तुप्पा, हट्टा, पिंपळदरी, जामगव्हाण आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.ेडोंगरकड्यात दमदारडोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात खरीप पिकांना दिलासा देणारा पाऊस झाला आहे. डोंगरकड्यासह परिसरातील भाटेगाव, वरुड, झुंझुंवाडी, देववाडी, चिंचवाडी, हिवरा, जामगव्हाण, सुकळीवीर आदी गावामध्ये ६ व ७ जुलैै रोजी झालेल्या जोरदार पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला असून यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.पार्डीत दिलासापार्डी खु : वसमत तालुक्यातील पार्डी खु. परिसरातील कोठारी, कानोसा, कोठारवाडी या भागामध्ये १० ते १२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी सायंकाळी ५ पासून दमदार पावसाने हजेरी लावली. दोन दिवसात दमदार पाऊस पडत असून दिवसभर कडक ऊन तापत आहे.गेल्या आठवड्यामध्ये पिके सूकू लागली होती पण गेल्या दोन दिवसामध्ये पावसाच्या आगमनामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर गावालगत असलेल्या पाझर तलावामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे.हिंगोली शहर व परिसरातही दिवसभर कधी भुरभुर तर कधी पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी दहानंतर दिवसभर पावसाचा हा खेळ सुरू होती. रात्री साडेनऊच्या दरम्यान पाऊस थांबला होता.तब्बल १२ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. त्यानंतर काही शेतकºयांनी कोळपणी,वखरणी, निंदणी शेतातील कामे आटोपून पावसाची वाट शेतकरी अतूरतेने बघत होते. तीन दिवसांपासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस चालू होता. या पावसाने शेतकºयामध्येसमाधानाचे वातावरण आहे. ७ जुलै रोजी सकाळी जिल्हाभरात अनेक गावात पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसाने पीकांना जीवदान मिळाले असून खरीप पीके वाढीला लागले आहे. यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे.केंद्रा बु. परिसरात पाच वर्षांत पहिल्यांदाच पूर४केंद्रा बु.- सेनगाव तालुक्यातील मागील पाच वर्षापासून पावसाचे प्रामण अत्यल्प होत होते. त्यामुळे परिसरातील विहिरी, बोअर डिसेंबर ते जानेवारी महिन्यातच कोरडे पडत होते. यावर्षी ७ जुलै रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास एक तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे केंद्रा बु. येथील नदीला मोठा पुर आला. पाच वर्षातील पहिलाच पुर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी नदी काठावर मोठी गर्दी केली होती.खरीपातील पिकांना चांगल्या पावसाची गरज होती. निसर्गाकडून शेतकºयांसाठी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण आहे. विहिरी, बोअरच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. मागील पाच वर्षात या भागात शापीत पट्टा अशी अवस्था होती. परिसरातील ताकतोडा, कहाकर, वरखेडा, बटवाडी, केंद्रा खु., हिवरा, माहेरखेडा, वलाना, मन्नास पिंपरी, जामठी बु., गोंधनखेडा आदी सर्वच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जनावरांच्या पिण्याचा पाण्याची व हिरव्या चाºयाची समस्या मिटली आहे. केंद्रा बु. नदीवरील पुराच्या पाण्याने वृत्त लिहिण्यापर्यंत दोन तासापासून गोरेगाव- रिसोड मार्ग बंद झाला होता. पुलाची उंची वाढविण्यासाठी अनेकवेळा सा.बां. विभागाला सूचना देवूनही उपयोग होत नाही.कळमनुरी तालुक्यातही दमदार पाऊसशहर व परिसरात ७ जुलै रोजी दीड तेदोन तास दमदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. ६ जुलै पासून रिमझिम पाऊस पडत होता. ७ जुलै रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसाने छोटे नाले तुडूंब भरून वाहिले. तालुक्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस पडला. ७ जुलै रोजी दिवसभर पाऊस कमी जास्त सुरूच होता. शेतात पाणीच पाणी साचले होते. शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. पिकांची वाढ झपाट्याने होणार आहे. पावसामुळे इसापूर धरणाचे पाणी वाढत आहे.
जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:00 IST