कळमनुरीच्या माळीगल्लीतील विलास सातव हा येथे दारू विकत असताना आढळला. त्याला पकडून पोलीस हवालदार रोहिदास राठोड यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. दारूची किंमत तीन हजार रुपये आहे.
मटका घेणाऱ्यास पकडले
हिंगोली : औंढा तालुक्यातील जामगव्हाण येथे मटक्याच्या चिठ्ठ्या फाडून मटका खेळविणाऱ्या एकास ८ सप्टेंबर रोजी दुपारी १.५० च्या सुमारास पकडले. देवानंद गोविंद मोरे असे त्याचे नाव असून त्याच्याकडे एक मोबाईल, रोख १६८० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोहेकाँ शालीग्राम आंभोरे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पत्नीलाच बदनाम करण्याची धमकी
हिंगोली : पत्नीच्या भावाच्या मोबाईलवर संदेश पाठवून तिला बदनाम करण्याची धमकी देणाऱ्यावर बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. सध्या माहेरी हिवरा बेल येथे राहात असलेल्या एका महिलेशी तिचा पती अभिषेक घुगे रा. मोराळडोह, जि. वाशिम याचे काही दिवसांपासून जमत नसल्याने ती माहेरी आहे. या महिलेच्या भावाच्या मोबाईलवर मेसेज करून तुझ्या बहिणीस बदनाम करतो. तसेच तिच्या वडिलांना व भावास जिवे मारण्याची धमकी दिल्याने तिने बासंबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.