शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चार दुकाने फोडून हजारोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:29 IST

शहरातील हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर असलेली चार दुकाने १ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री फोडून हजारोचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : शहरातील हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर असलेली चार दुकाने १ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री फोडून हजारोचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली.येथील बसस्थानकाजवळ व मुख्य रस्त्यावर असलेल्या खंडू हरिभाऊ काळे यांची एस.के. बियर शॉपीचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यातील १५ हजार रोख व २ बिअरचे बॉक्स किंमत ४ हजार रुपये लंपास केले. नंतर चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या ओमकार वैजनाथ नावडे यांच्या भुसार मालाच्या दुकानाचे शटर तोडले व त्यातील रोख एक हजार रुपये लंपास केले. या दुकानात भुसार माल असल्याने त्यांची निराशा झाली. त्यांनी बाजूलाच असलेल्या गजानन रामदास शिंदे यांचे हॉटेल फोडले येथे चोरट्यांनी भजे, चिवडा खाल्ला व बियरही ढोसली. तेथे बियरच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा माधव धुरपतराव खरवडे यांच्या प्रगती किराणा दुकानाकडे वळविला. या किराणा दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला व गल्ल्यात ठेवलेले एक लाख छप्पन हजार व ७ ते ८ हजार रुपयांची चिल्लर लंपास केली. पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग वाकोडी रस्त्यापर्यंत केला. अंधाराचा फायदा घेत चोरटे तेथून बेपत्ता झाले. ही माहिती मिळताच पोनि जी.एस. राहिरे व कर्मचाºयांनी घटनास्थळी पंचनामा केला.ठसेतज्ज्ञांना बोलावण्यात आले. उशिरापर्यंत चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरट्यांनी दोन लाखांच्या जवळपास ऐवज लंपास केला.मुलीच्या लग्नासाठी काढलेले पैसेही पळविलेमाधव खरवडे यांच्या मुलीचे लग्न ठरल्याने त्यांनी १ फेब्रुवारी रोजी महाराष्टÑ ग्रामीण बँकेतून रक्कम काढून ती दुकानात ठेवली होती. मुलीच्या लग्नासाठी एकेक रुपया जमा केला होता. त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला. आता मुलीचे लग्न कसे करावे? असा प्रश्न खरवडे यांच्या समोर आहे. जमा केलेली रक्कम गेल्याने त्यांना काय बोलावे हे सुचेनासे झाले होते. आता एवढी रक्कम कशी जमा करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. दरम्यान फौजदार एस.एस. घेवारे, रिठ्ठे, जोगदंड हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना दोघेजण नवीन बसस्थानकाजवळ आढळून आले. पोलिसांना पाहताच हे दोघे जण मोटारसायकल घेवून सुसाट वेगाने जात होते. चिल्लर रक्कम लमानदेवजवळच्या रस्त्यावर टाकून पळाले.