शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा धुडगूस; पोलिसांनी दोन पथक नेमले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 20:05 IST

जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडघूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दागिणे, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसां समोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून चोरट्यांनी धुडघूस घातला असून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दागिणे, रोकड व दुचाकी चोरींच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरींच्या घटनामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसां समोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मागील पंधरा दिवसांत १२ चोरींच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली.

जिल्ह्यात घराफोडींचे प्रमाण वाढल्याने पोलिसांसमोर जणू चोरट्यांनी त्यांना पकडण्याचे आव्हानच केले आहे. विशेष म्हणजे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलुप तोडून चो-यांचे प्रमाण जास्त आहे. डिसेंबर महिन्यात जास्तीत-जास्त चोरींच्या घटना घडल्या आहेत. मागील पंधरा दिवसांत तब्बत १२ चोरी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची नोंद पोलीस दरबारी आहे. घटनांची संख्या लक्षात घेता पोलिसांना जणू चोरट्यांनी एका प्रकारे आव्हानच केले आहे. विशेष म्हजणे तपासिक अंमलदाराकडून चोरट्यांचा कसून शोध घेतला जात असला तरी, अद्याप एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. चो-यांच्या घटनांमुळे एखादी परराज्यातील टोळी हिंगोली जिल्ह्यात दाखल तर झाली नाही, असा अंदाज नागरिक काढत आहेत.

असे दाखल आहेत चोरींचे गुन्हे

कळमनुरी तालुक्यातील बाळापुरातही चोरींचे प्रमाण जास्त आहे. १५ डिसेंबर रोजी भरदिवसा शिक्षक कॉलनीतील एका घराचे कुलूप तोडून दीड लाख रुपये नगदी व सोन्याचे दागिने असा २ लाख २७ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. वसमत तालुक्यातील वर्ताळा येथील शेतातून चोरट्यांनी विहिरीतील विद्युत मोटार व इतर साहित्य एकूण २३ हजार ५२० रूपयांची चोरी केली. याप्रकरणी ४ डिसेंबर रोजी कुरूंदा ठाण्यात चोरीची नोंद केली. ७ डिसेंबर रोजी वसमत तालुक्यातील हट्टा ठाण्यातही चोरीचा गुन्हा दाखल आहे. वसमत येथील रेल्वेस्थानकावर एकास तलवारीच्या धाकावर लुटले, असून याप्रकरणी १ डिसेंबरला जबरी चोरीचा गुन्हा वसमत शहर ठाण्यात दाखल आहे. हिंगोली शहरातील महसूल कॉलनी येथे घराचे कुलुप तोडून सोने-चांदीचे दािगणे लंपास केल्याची घटना घडली होती याप्रकरणी १२ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल आहे. तर १४ डिसेंबर रोजी वसमत येथील मोंढ्यातून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. यासह विविध घटनांच्या नोंदी पोलीस दरबादी दाखल असून तपास सुरू आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कि, कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापुर परिसरात चोरींचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे नांदेड येथील चोरट्यांचा या घटनांशी जास्त संबध असू शकतो. पोलीस प्रशासनाकडून चो-यांच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेत कसून तपासणी सुरू असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी सांगितले. तपास मोहीमेसाठी दोन पथकेही तैनात असल्याची माहिती गुंजाळ यांनी 'लोकमत'  शी बोलताना दिली.