शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममशीनमध्ये छेडछाडकरून रक्कम लांबविणारे चोरटे निघाले हरियाणा राज्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 14:20 IST

शहरातील देवडा नगर, शिवाजी नगर व नवीन मोंढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून रक्कम पळवली

ठळक मुद्देहिंगोलीतील चोरीनंतर परभणीतील एटीएममध्ये केली चोरीसायबर सेलने बजावली महत्वाची भूमिका

हिंगोली : एटीएममध्ये छेडछाड करून ४६ हजार ५०० रूपयांची रक्कम लांबविणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली असून घटनेत चौघे चोरटे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील तिघे चोरटे हरियाणा राज्यातील निघाले. त्यांच्याकडून १० हजार ४०० रूपयांची रक्कम जप्त केली आहे.

शहरातील देवडा नगर, शिवाजी नगर व नवीन मोंढा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये छेडछाड करून त्यातील ४६ हजार ५०० रूपयांची रक्कम लांबविल्याप्रकरणी १९ जून रोजी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी याप्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना हिंगोली शहर पोलिसांना दिल्या होत्या. त्यावरून पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी त्यांच्या पथकाला कामाला लावले. पोलिसांनी एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी तीन ते चार जणांनी एटीएममध्ये छेडछाड केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी शहरातील लॉजमध्येही शोध घेवून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती एका लॉजमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आली. 

अधिक तपास केला असता जावेद अली (रा. पलवल, हरियाणा) याच्या नावे १७ जून रोजी एक रूम बुक असल्याचे समजले. त्याने लॉजमध्ये दिलेल्या मोबाईलनंबरच्या लोकेशन वरून त्याला अकोला बायपास भागातून ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता गुन्ह्याची कबूली दिली. तसेच यात गारमाळ येथील सलीम प्यारेवाले तसेच अन्य दोघे हरियाणा राज्यातील असल्याचे सांगितले. पोलिसांनी सलीम प्यारेवाले याला जालना येथून अटक केली असून दोघांकडून १० हजार ४०० रूपयांची रक्कम जप्त केली आहे.

हिंगोलीतील चोरीनंतर परभणीतील एटीएममध्ये केली चोरीहिंगोली शहरातील तीन एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून पैसे लांबविल्यानंतर चोरट्यांनी परभणीतील दोन एटीएममधील पैसे लांबविल्याचे पोलिसांना सांगितले. तसेच चोरीतील पैसे वाटून घेत वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. मात्र लॉजमध्ये दिलेल्या मोबाईलनंबरमुळे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अलगत सापडले. चोरटे हरियाणा राज्यातील असल्याने अशा गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सायबर सेलने बजावली महत्वाची भूमिकाएटीएममध्ये चोरी करणाऱ्यांचा शोध घेण्यात सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरली. मोबाईल लाेकेशन अचूक काढल्याने चोरटा अलगत पोलिसांच्या जाळ्यात सापडला. चोरीचा तपास करणाऱ्या पथकात पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक प्रकाश कांबळे, पोह शेख शकील, शेख मुजीब, सुधीर ढेंबरे, गजानन होळकर, उमेश जाधव, असलम गारवे, पोशि गणेश लेकूळे, दिलीप बांगर, सायबरसेलचे जयप्रकाश झाडे, मुदीराज आदींचा समावेश होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली