शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीही नसते वीज; महावितरणचा तांत्रिक बिघाड उठला शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:37 IST

हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून मागील पाच ते सहा वर्षांत ४०० ते ५०० कोटींची बळकटीकरणाची कामे करण्यात आली.

ठळक मुद्देपिकांना पाणी देण्यासाठी करावी लागते कसरत

हिंगोली : महावितरणकडून तांत्रिक समस्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांना रात्रंदिवस वीज दिली जात नसल्याचा प्रकार घडत आहे. दिवसा आठ तास आणि रात्री दहा तासांची वीज तर कागदावरच असून कारण विचारले तर तांत्रिक बिघाड पुढे करून शेतकऱ्यांची बोळवण केली जाते.

हिंगोली जिल्ह्यात यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांना रबीच्या हंगामाची आस  आहे. मात्र वीजच राहात नसल्याने गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. हिंगोली जिल्ह्यात महावितरणकडून मागील पाच ते सहा वर्षांत ४०० ते ५०० कोटींची बळकटीकरणाची कामे करण्यात आली. तरीही ग्रामीण भागात वीज सुरळीत राहात नाही. अनेक कंत्राटदारांवर आरोप झाले. तपासणी झाली. मात्र कारवाई शून्य असल्याने त्याचा फटका आता शेतकरी भोगत आहेत. केवळ भार वाढल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली जात आहे.

रात्रीचा वीजपुरवठा धोकादायकशेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वेळेनुसार शेतात जावे लागते. रात्री-अपरात्री वीज येत असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी स्टार्टरमध्ये बिघाड झाल्यास शेतकऱ्यांना दुरुस्तीसाठी जावे लागते. यामध्ये साप, विंचू  व  वन्य प्राण्यांचा सर्वाधिक धोका शेतकऱ्यांना असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दहा तास वीजपुरवठा करण्याऐवजी सकाळी वीजपुरवठा करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे. 

पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणीयावर्षी जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांकडील असलेल्या विहीर, बोअर आदी जलस्त्रोतांना मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर सध्या शेतकरी रबी हंगामातील ज्वारी, हरभरा व गव्हासाठी करीत आहेत. एकीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनीच्या उदासीनतेने शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याचा फायदा घेता येत नाही. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितार्थ  मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना सुरू करण्याची गरज आहे.

सध्या गव्हू, हरभरा पिकांना विहिर, बोअरद्वारे पाणी देण्यात येत आहे. मात्र महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. यामुळे विहिर, बोअरला पुरसेशे पाणी उपलब्ध असूनही पिकांना पाणी मिळत नसल्याचे चित्र सध्या हिंगोली तालुक्यातील सवड परिसरात आहे.   - सदाशिव थोरात, शेतकरी

दिवसा आठ तर रात्री दहा तास वीजपुरवठा करण्याचा महावितरणचा प्रयत्न असतो. मात्र तरीही तांत्रिक अडचण आल्यास तेवढ्या भागापुरताच वीजपुरवठा काही काळ खंडित असतो. त्याशिवाय भारनियमन केले जात नाही - नरदेव, महावितरण अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीelectricityवीज