शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पणन मंडळाच्या केळी प्रक्रिया केंद्रात ५ लाखांच्या साहित्यांची चोरी; गुन्हा नोंदविण्यास लागले पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 12:38 IST

वसमत येथे पणन मंडळाचे मालकीचे केळी प्रक्रिया आणि निर्यात केंद्र आहे. पणनचे केंद्र उभे राहिले मात्र त्याचा वापरच होत नाही.

ठळक मुद्देपणन मंडळाच्या मालकीच्या डीपीतील तांब्याची तार आणि ऑईल लांबवलेयाप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात तब्बल पाच दिवसाचा वेळ गेला.

वसमत ( हिंगोली ) : येथील पणन मंडळाच्या मालकीचे असलेल्या केळी प्रक्रिया केंद्रातील विद्युत डीपीतील तांब्याची तार आणि ऑईल असा पाच लाख 23हजार 396रू चा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे . 17 जून रोजी घडलेल्या प्रकरणी 22 जूनच्या रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे

वसमत येथे पणन मंडळाचे मालकीचे केळी प्रक्रिया आणि निर्यात केंद्र आहे. पणनचे केंद्र उभे राहिले मात्र त्याचा वापरच होत नाही. वीज नाही म्हणून कोट्यवधीच्या मशीन आणि साहित्य वापराअभावी पडून आहे. सध्या हे केंद्र हळद साठवणीसाठी सूर्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने चालविण्यास घेतलेले आहे. या केंद्रातील विद्युत जनित्र पणन मंडळाच्या मालकीचे आहे. 17 जून च्या रात्री या जनित्रला जमिनीवर पाडून त्यांतील तांब्याची तार आणि ऑईलची चोरी करण्यात आली. चोरट्यांनी एकूण पाच लाख 23हजार 396 रुपयांचे साहित्य चोरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी 22 जूनच्या रात्री वसमत शहर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रल्हाद रामराव बोरगड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे हे करत आहेत. दरम्यान, पणन मंडळाच्या मालकीच्या केंद्रातील ही चोरी चर्चेचा विषय झाली आहे 

गुन्हा नोंदवण्यास पाच दिवसशासकीय मालमत्ता असलेल्या केळी प्रक्रिया केंद्रात 17जून रोजी अजब चोरी झाली. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात तब्बल पाच दिवसाचा वेळ गेला. गुन्हा लगेच दाखल झाला असता तर तपास लगेच सुरू होऊ शकला असता. परंतु, गुन्हा दखल करण्यात वेळ लागला. या मागील कारणांचाही तपास होण्याची गरज आता व्यक्त होत आहे. महाकाय डीपी जमिनिवर काढून त्यातील साहित्य लांबणार चोरटे हे या कामातील तज्ञाच असावेत असा अंदाज आहे. आता तपास कसा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे

टॅग्स :theftचोरीHingoliहिंगोली