शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून युवकाचा खून करून मृतदेह १०० किमी दूर नेऊन टाकला

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: August 8, 2022 18:58 IST

सेनगाव पोलिसांनी २४ तासांत लावला तपास,बरडा येथे पुलाखाली आढळला होता मृतदेह

सेनगाव (जि. हिंगोली): तालुक्यातील बनबरडा शिवारात एका पुलाखाली असलेल्या पाण्यात अनोळखी तरुणाचा मृतदेह ७ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आढळून आला. तसेच घटनास्थळी एक दुचाकीही आढळली होती. या मारेकऱ्यांनी अत्यंत शिताफीने केलेल्या खुनाचा सेनगाव पोलिसांनी २४ तासांच्या आत मृतदेहाची ओळख पटवित मारेकऱ्यांनाही ताब्यात घेतले.

बनबरडा शिवारातील सरस्वती नालामध्ये रविवारी सकाळी शेतकऱ्यांना एक अनोळखी मृतदेह व मोटारसायकल आढळली होती. मृतदेहाच्या अवस्थेवरून मारेकऱ्यांनी धारधार शस्त्राने वार करून सदर युवकाचा खून केला असल्याचा अंदाज घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस निरीक्षक रणजित भोईटे व त्यांचा सहकाऱ्यांना आला. परंतु मयताची ओळख पटल्याशिवाय पुढे तपास सरकणार नव्हता. अशावेळी पोलिसांनी बारकाईने मृतदेहाची पाहणी करत असताना यावेळी घटनास्थळी हजर असलेले जमादार सुभाष चव्हाण यांनी मृतदेह पाहता क्षणी ओळखला. जमादार चव्हाण यांनी मृतदेह पाहताच यापूर्वी हिंगोली ग्रामीण येथे कर्तव्यावर असताना सदर मृतदेह असलेल्या युवकावर मोटारसायकल चोरीचा गुन्हा होता.

सदर युवक हा पांगरी (ता. हिंगोली) येथील हरीदास वकृजी टापरे हा असल्याचे सांगितले. त्यानंतर तपास चक्रे वेगाने फिरली. सदर युवकाचा अनैतिक संबंधातून खून झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या प्रकरणात संशयितांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविला. त्यात आरोपींनी अनैतिक संबंधाच्या कारणांमुळे हरदीस यांच्या डोक्यावर, मानेवर जबर वार करीत जीवे मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी वाहनाद्वारे मोटारसायकलवर प्रेत घटनास्थळापासून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर टाकले. परंतु पोलिसांना या खुनाचा २४ तासांत उलगडा करीत आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी अरविंद हरीदास टापरे यांच्या फिर्यादीवरून व्यंकटी गोविंदा मस्के, ज्ञानेश्वर बबन गिरे, संतोष नामदेव बानबुडे, आशाबाई बबन गिरे (सर्व रा. लोहगाव) यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली