शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलले अन् सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण, ओपीडी दीडपटीने वाढली

By रमेश वाबळे | Updated: January 23, 2024 19:41 IST

हिंगोली जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या रांगा; दिवसभराची ओपीडी गेली ८१४ वर

हिंगोली : मागील आठवड्यापासून वातावरणात बदलाचा फटका बसत असून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे मंगळवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात ८१४ ओपीडी झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

वातावरणात सतत बदल होत असून, मागील दोन दिवसांपासून पहाटे आणि सायंकाळच्या वेळी गारवा, तर दुपारच्या वेळी वातावरणात उकाडा जाणवत आहे. अशा बदलत्या वातावरणाचा फटका बसत असून, प्रामुख्याने आबालवृद्धांना अधिक त्रास होत आहे. सर्दी, ताप, खोकल्यासह अंगदुखीच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णसंख्या वाढली आहे. दररोज जवळपास ६०० ते ७०० ओपीडींची नोंद होती; परंतु मागील चार दिवसांत रुग्णसंख्या वाढल्याने ओपीडी आठशेंवर गेली आहे.त्यातच रविवारी हक्काची सुटी आणि सोमवारी अयोध्येतील कार्यक्रमानिमित्त सुटी देण्यात आली. यादरम्यान रविवारी तीन तासांची ओपीडी घेण्यात आली; परंतु सुटीत रुग्णांनी येणे टाळले. त्यामुळे मंगळवारी रुग्णांची मोठी गर्दी झाली होती. चिठ्ठी काढण्यासाठी महिला आणि पुरुष रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात ८१४ रुग्णांची नोंद झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

सर्दी, खोकल्यासह तापाने फणफणले रुग्ण...वातावरण बदलाचा फटका सर्वाधिक आबालवृद्धांना बसू लागला आहे. सर्दी, खोकला, अंगदुखीसह रुग्ण तापाने फणफणत आहेत. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. व्हायरल फिव्हरमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे डाॅक्टरांचे म्हणणे आहे.

बालरोग विभाग हाऊसफुल्ल...रुग्णांमध्ये बालकांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभाग हाऊसफुल्ल झाला आहे. सर्दी, ताप, खोकल्यासह डेंग्यूची लागण झालेले बालरुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत.

वातावरण बदलाचा फटका; नागरिकांची काळजी घ्यावी...वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत.  त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.  जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडींत वाढ झाली असून, विविध आजारग्रस्तांची तज्ज्ञांमार्फत तपासणी करून औषधोपचार करण्यात येत आहेत. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे.-डाॅ.नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, हिंगोली

टॅग्स :Hingoliहिंगोलीhospitalहॉस्पिटल