शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेडिमेड कपड्यांमुळे टेलरिंग व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:26 IST

त्यामुळे कपडे शिवणाऱ्या या कामगारांवर आता हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देदिवाळीतही शिवणकाम येत नाहीयंदा दुष्काळामुळे ग्रामीण ग्राहकीही घटली

हिंगोली : दिवसें-दिवस रेडिमेड कपड्यांकडे ग्राहकांचा कल वाढतच चालला आहे. रेडिमेड कपड्यांमुळे मात्र टेलरिंग व्यवसाय धोक्यात सापडला आहे. त्यामुळे कपडे शिवणाऱ्या या कामगारांवर आता हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे.शिवणकला हा पारंपरिक व्यवसाय दुारापास्त होत चालला आहे. स्टाईलिश रेडिमेड कपड्यांमुळे पारंपरिक कपडे शिवण्याचा व्यवसाय धोक्यात सापडला आहे. त्यामुळे शिंपी बांधवांसमोर स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे. पारंपरिक कपडे शिवण्याचा व्यवसाय रेडिमेडच्या जमान्यात मात्र संकटात सापडल्याने व्यावसायिकांना तर हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. लग्नसोहळा सण उत्सवानिमित्त नवीन कपडे खरेदीसाठी आता रेडिमेड कपड्यांच्या दुकानावर हाऊसफुल गर्दी होते. परंतु शिंपी यांच्या दुकानावर मात्र कपडे शिवण्यासाठी गर्दी होत नाही. पूर्वी कपडे खरेदी केल्यानंतर ते शिवून घेण्यासाठी शिंपी बांधवाकडे झुंबड उडायची. हाताला काम मिळाल्याने टेलरही आनंदात असायचे. परंतु रेडिमेड स्टाईलिश आणि फॅशनेबल कपडे खरेदीकडे दिवसेंदिवस वाढणारा कल पाहता आता टेलर व्यावसायिकांकडे कोणी फिरकतही नसल्याचे चित्र आहे.पंधरा वर्षापूर्वी होती ग्राहकांची मोठी गर्दी...हिंगोली शहरातील सदर बाजार परिसरात रस्त्यावर बसणाºया शिंप्याकडे पंधरा वर्षापूर्वी ग्राहकांची मोठी गर्दी होत असे. कामात मग्न असल्याने व शिवणकाम हातावर सुरूच असल्यामुळे अनेकदा जेवण करायलाही वेळ मिळत नसे, असे मागील चाळीस वर्षांपासून शिवणकाम करणारे राधेश्याम चौधरी यांनी सांगितले. परंतु आता तर ऐन सणासुदीतही हातावर हात ठेवून बसावे लागत आहे. किरकोळ कामेही आता कमी झाली आहेत. रफू करणे, बटन लावणे, चेन बसविणे, फाटलेले सदरे शिवणे अशी किरकोळ कामेही आता मिळत नसल्याचे सांगितले जात होते. सध्या दुकानांतील टेलरकडे ५०० रूपयापर्यंत सदरा शिवून दिला जातो. तर रस्त्यावरील शिंपी केवळ अडीचशे ते तीनशे रूपयांत सदर शिवतात, असे चौधरी म्हणाले. मागील अनेक वर्षांपासून शिवणकाम हाच व्यवसाय असल्याने दुसरे कामही जमत नाही. त्यामुळे आता करावे तरी काय, असा प्रश्न निर्माण झाल आहे.

पूर्वी कपडे शिवण्यासाठी गर्दी होत असेपूर्वी कपडे शिवण्यासाठी गर्दी होत असे. परंतु मागील पंधरा वर्षांपासून हाताला शिवणकाम मिळत नाही. त्यामुळे कुटुुंबावर उपासमारीची वेळ येते की काय, असा प्रश्न नेहमी भेडसावत असतो, असे ३५ वर्षांपासून टेलरिंग काम करणारे संतोष सुधाकरराव वºहाडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीbusinessव्यवसाय