शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या अटकेसाठी गावात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 01:30 IST

येथे एका ३४ वर्षीय तरूणाने ३० आॅगस्ट रोजी पत्नीच्या अनैतिक संबधाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरूवातीला पोलिसांकडून विलंबाने गुन्हा नोंद करून घेत असताना यातील आरोपी मात्र फरार असल्याने २ सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवीत ग्रामस्थांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथे एका ३४ वर्षीय तरूणाने ३० आॅगस्ट रोजी पत्नीच्या अनैतिक संबधाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरूवातीला पोलिसांकडून विलंबाने गुन्हा नोंद करून घेत असताना यातील आरोपी मात्र फरार असल्याने २ सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवीत ग्रामस्थांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.गोरेगाव येथील हनुमान परसराम कावरखे (३४) यांनी पत्नीने ठेवलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून ३० आॅगस्ट रोजी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याप्रसंगी प्रेत शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करीत असताना मयताचा भाऊ कांता कावरखे व अन्य नातेवाईक व ग्रामस्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यास गेले असता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करता येत नाही, असे म्हणत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचा सल्ला दिला व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. प्रसंगी ठाण्यात ३०० ते ४०० ग्रामस्थांचा जमाव जमल्याने गुन्हा नोंद करण्याची मागणी लावून धरीत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेतला.अखेर साडेतीन तासानंतर मयताची पत्नी नीता हनुमान कावरखे, तिचा प्रियकर विठ्ठल दगडू अवचार (रा.किनखेडा जि.वाशिम) यांच्यासह आई निर्मला रमेश शिंदे, वडील रमेश गणपत शिंदे (रा.येवती जि.वाशिम) या चौघांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र चारही आरोपी अद्याप मोकाटच असून पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेबद्दल २ सप्टेंबर रोजी गाव कडकडीत बंद ठेवीत ग्रामस्थांनी ठाण्यात मोर्चा नेला. याप्रसंगी सपोनि माधव कोरंटलू यांनी आरोपीला लवकर ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस