शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? ... तर दुबार पेरणीसाठी खत मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

यंदा जिल्ह्यातील ७५ टक्के पेरण्या सध्या आटोपल्या आहेत. खरीप ज्वारीची पेरणी ३६४६ हेक्टर, मका ६१३ हेक्टर, तूर ३८ हजार ...

यंदा जिल्ह्यातील ७५ टक्के पेरण्या सध्या आटोपल्या आहेत. खरीप ज्वारीची पेरणी ३६४६ हेक्टर, मका ६१३ हेक्टर, तूर ३८ हजार ९३१ हेक्टर, मूग ६८४४ हेक्टर, उडीद ५२९७ हेक्टर, सोयाबीन २.४१ लाख हेक्टर, कापूस २५ हजार ६५१ हेक्टर तर हळद ४० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४.२४ लाख हेक्टर असून ३.२२ लाख हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. मात्र मागील महिनाभरात दुसऱ्यांदा पावसाने ओढ दिली आहे. यापूर्वी अशीच नेमकेच पीक अंकुरले असताना दहा दिवसांची ओढ दिली होती. आता पुन्हा पिके वाऱ्यावर डोलत असतानाच पावसाने उघडीप दिल्याने माना टाकत आहेत. हलक्या जमिनीतील पिके तर आणखी तीन दिवसही तग धरतील की नाही, अशी परिस्थिती आहे. जर आता पिके हातची गेली तर दुबार पेरणीसाठी सोयाबीनच्या बियाणाचा मोठा प्रश्न आहे. शिवाय खतेही मिळतील की नाही, याची शंका आहे. यामुळे शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.

सोयाबीनचा पेरा वाढला

दरवर्षीप्रमाणेच यंदाही साेयाबीनचा पेरा वाढला आहे. शेतकऱ्यांनी २.२५ लाख हेक्टर म्हणजे १४३ टक्के पेरणी केली आहे. या पिकाकडील शेतकऱ्यांचा कल दरवाढीमुळे कायम राहिल्याचे दिसत आहे.

... तर दुबार पेरणी

यंदा शेतकऱ्यांना पेरणी केल्यापासून दुसऱ्यांदा पावसाने हुलकावणी दिली आहे. यावेळी मात्र दिवसभर कडक ऊन पडत असून, कधीतरी ढगाळ वातावरण राहत आहे. त्यामुळे पिके वाळून जाण्याची भीती आहे. अधून-मधून कुठेतरी पाऊस पडत असला तरीही सर्वत्र नाही.

कोणत्या तालुक्यात किती पाऊस

तालुका पाऊस पेरणी

हिंगोली २५२ मि. ७५३९८

कळमनुरी २५४ ५४००५

वसमत २३५ ५९३४७

औंढा ना. २८९ ५३९८८

सेनगाव २४१ ७९७१२

जिल्ह्यातील सध्याची स्थिती

आजपर्यंत अपेक्षित पाऊस २३० मिमी

प्रत्यक्ष झालेला पाऊस २५१ मिमी

आतापर्यंत झालेली पेरणी ३२२४५० हे.