शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडची प्रयोगशाळेत तांत्रिक अडचण; आता अँटीजनवरच हिंगोली जिल्ह्याची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 19:07 IST

हिंगोलीत उभारण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेची मशिन गुरुवारी येणार असून ती कार्यान्वित होण्यास १२ दिवस लागणार आहेत.

ठळक मुद्देझटपट चाचणी म्हणून अँटीजनचा आधार घेतला जात आहे. अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास निदान उपचार तरी सुरू

हिंगोली : नांदेड येथील आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेच्या अडचणीमुळे हिंगोली जिल्ह्यातील थ्रोट स्वॅब सात ते आठ दिवस प्रलंबित राहात असून आणखी तीन दिवस ही समस्या कायम राहणार आहे. हिंगोलीत उभारण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेची मशिन गुरुवारी येणार असून ती कार्यान्वित होण्यास १२ दिवस लागणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य यंत्रणेची साधने अपुरी पडू लागली आहेत. खाटा मिळेनात, आॅक्सिजन मिळेना, इंजेक्शन मिळेना अशा समस्या आजवर होत्या. आता त्यात आरटीपीसीआर चाचणीही होत नसल्याच्या नव्या समस्येची भर पडली आहे. त्याचा परिणाम म्हणून मागील दोन -तीन दिवसांपासून हिंगोलीच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. झटपट चाचणी म्हणून अँटीजनचा आधार घेतला जात आहे. मात्र त्यापेक्षा जास्त आरटीपीसीआर चाचणीवर भरवसा असल्याने या चाचणीकडेच बहुतांश जणांचा कल आहे. असे असले तरीही ही चाचणीही होण्यास आता सात ते आठ दिवसांचा काळ लागत आहे. त्यामुळे तोपर्यंत या रुग्णावर उपचार करायचे तरी कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे. अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आल्यास निदान उपचार तरी सुरू करता येतील म्हणून सध्या या चाचण्यांवर भर दिला जात आहे.

मागील दोन महिन्यांपासून येथील आॅक्सिजन प्लांट व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे काम सुरू आहे. किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने या कामाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दोनदा भेट द्यावी लागली. त्यांनी अतिशय कडक शब्दांत संबंधितांचे कान टोचल्यावर या कामाला गती आली. आता आॅक्सिजनचा टँक बसविला. मात्र मशिन व पाईपलाईनचे काम होण्यास आणखी सहा दिवस लागतील. पूर्वीची पाईपलाईन वापरात येणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र ती वापरात येईल, असे सांगितले जात आहे. मशिन कार्यान्वित होताच आॅक्सिजन उपलब्ध होण्यासाठी आॅक्सिजनची आॅर्डर उद्या देणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.

गुरुवारी येणार मशीन; नंतर केंद्राचे पथकहिंगोलीतील आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा मंजूर करण्यासाठी खा.राजीव सातव यांच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी जिल्हा नियोजनमधून निधी मंजूर केला होता. त्यानंतर हे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे.४कामाला विलंबामुळे मोठी ओरड होत आहे. यात चार दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अन्यथा आणखी किती दिवस लागतील, याचा काही नेम नव्हता असेच चित्र आहे.४याबाबात विचारले असता जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, प्रयोगशाळेसाठी लागणारी मशिन आता गुरुवारी हिंगोलीत दाखल होणार आहे. त्यानंतर ती प्रयोगशाळेत बसवून पूर्ण यंत्रणा सज्ज करायला किमान चार दिवस लागतील. ती सज्ज झाली की तत्काळ केंद्राचे पथक पाहणी करायला येईल. त्यांच्या परवानगीनंतरच ही प्रयोगशाळा सुरू करता येणार आहे. त्यासाठी एकूण दहा ते बारा दिवसांचा काळ जाणार आहे. त्यानंतरच हिंगोलीत प्रयोगशाळा कार्यान्वित होणार आहे. 

टॅग्स :Hingoliहिंगोलीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस