शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पुरस्कार गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:40 IST

आदर्श पिढी घडविणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना जवळ आला तरी, अद्याप पात्र शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे याचे कारणही गुलदस्त्यात आहे. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आदर्श पिढी घडविणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाºया शिक्षकांना पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविण्यात येते. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना जवळ आला तरी, अद्याप पात्र शिक्षकांना पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे याचे कारणही गुलदस्त्यात आहे. यावर्षी एकूण १६ जणांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी ५ सप्टेंबर ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. यावर्षीचा पुरस्कार वितरण कार्यक्रम १७ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहितीही शिक्षण विभागाने यापूर्वी दिली. त्यातही बदल करण्यात आला. परंतु पुढची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे आदर्श शिक्षक पुस्कार सोहळा कधी पार पडणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. निवड समितीची बैठक झाली असली तरी विभागीय कार्यालय औरंगाबाद येथे प्रस्ताव पाठविण्यात आले नाहीत. त्यामुळे आता कोणत्या तारखेला पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल, याचा मेळ नाही. शिवाय याबाबत शिक्षण विभागाकडे माहितीही उपलब्ध नाही. संबधित तालुक्याच्या गट-शिक्षणाधिकाºयांनी जिल्हा शिक्षण कार्यालयात १६ शिक्षकांचे प्रस्ताव दाखल केले होते. प्रस्ताव मंजूरीनंतर कार्यक्रमाची तारीख ठरणार असल्याचे शिक्षकांतून सांगण्यात आले. परंतु दरवर्षीच पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलला जातो. याला संबधित शिक्षण यंत्रणा व जि. प. प्रशासन कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. वेळोवेळी कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला जात असल्याने हा सोहळा कधी पार पडणार? याबाबत शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिनी’ देणे शासन निर्णयानुसार बंधनकारक आहे. मात्र नियोजनाअभावी दरवर्षीच या सोहळ्याचे नियोजन बारगळते. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.पुरस्कार वितरणाबाबत दरवर्षी नियोजन केले जात नाही. त्यात बैठकही लवकर होत नाही. परिणामी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडतो, यावर्षीही गतवर्षीचे चित्र आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदTeacherशिक्षक