शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
4
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
5
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
6
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
7
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
8
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
9
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
10
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
11
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
12
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
13
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
14
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
15
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
16
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
17
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
18
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
19
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
20
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?

पापमोचणी एकादशीपासून ‘मिठाची’ यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:02 IST

हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी १ एप्रिल पापमोचणी एकादशीपासून पंचक्रोशिमध्ये प्रसिद्ध असलेल्या मीठाच्या यात्रेस प्रारंभ होत असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे.

बापूराव इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कनर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव या ठिकाणी १ एप्रिल पापमोचणी एकादशीपासून पंचक्रोशिमध्ये प्रसिद्ध असलेल्या मीठाच्या यात्रेस प्रारंभ होत असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे.श्री क्षेत्र नर्सी नामदेव हे ठिकाण संत नामदेवाची जन्मभूमी असून हे ठिकाणी पंचक्रोशीमध्ये सर्वदूर परिचीत आहे. या ठिकाणी दरवर्षी संत नामदेव महाराज यांच्या मंदिर परिसरामध्ये पापमोचनी एकादशीला यात्रा भरते. ही यात्रा मिठाची यात्रा म्हणूनही प्रसिद्ध आहे. १ एप्रिल पासून एकादशीला यात्रा महोत्सवाला प्रारंभ होत असून यात्रा महोत्सव काळामाध्ये महापुजा, नगर प्रदक्षिणा, कीर्तन, लाहीचा कार्यक्रम, महाप्रसाद इ. धार्मिक कार्यक्रमांसोबतच कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे.१ एप्रिल रोजी सकाळी ‘श्रीं’ची महापुजा संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच २ रोजी दुपारी ३ वाजता ‘श्रीं’ची गावातून मुख्य मार्गाने पालखी नगर प्रदक्षिणा टाळ, मृदंगाच्या गजरात व नामदेव जनाबाईच्या जयघोषामध्ये निघणार आहे. तसेच यावेळी फडकऱ्याकडून सकाळी महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. ३ रोजी बुधवारी दुपारी १२ वाजता लाहीचा कार्यक्रम होईल. ७ एप्रिल रोजी रविवारी कुस्त्याची भव्य दंगल आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार गजानन शिंदे यांच्या हस्ते होणार असून यावेळी संस्थानचे सचिव सुभाष हुले, उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, भारत महाराज, नवसाजी गुगळे, तसेच तुळशीराम काकडे, पांडुरंग टेकाळे, तुळशीराम गवते, सखाराम मोरे, सत्तारखॉ पठाण, विष्णू ढेंगडे, सुरेश काळे, दत्तराव वरणे, भिकाजी धाबे, भागवत सोळंके आदींसह पंचक्रोशीतील मान्यवर व कुस्ती प्रेमीची उपस्थिती राहणार आहे.कुस्ती स्पर्धेचे प्रथम बक्षीस ७१०० रुपये, द्वितीय ५१०० रुपये, तृतीय ४१०० रुपये, चतुर्थ ३१०० रुपये, पाचवे २१००, सहावे १५००, सातवे ११०० रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच काही उत्तेजनार्थ बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. तरी या स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.नर्सी नामदेव येथील श्री संत नामदेव महाराज यांची यात्रा मागील अनेक वर्षापासून पापमोचनी एकादशीला भरत असून ही यात्रा मीठाची यात्रा म्हणून ओळखल्या जाते. यात्रेतील वैशिष्ट्य म्हणजे यात्रेमध्ये येणारे पंचक्रोशीतील भाविक यात्रेकरू हे येताना सोबत आंबाड्या, मोहऱ्या, ऐरंड्या, बीब, बरू, मटकी आदी धान्याच्या बदल्यात वर्षभर पुरेल एवढे मीठ खरेदी करतात. तर काही भाविक प्रसाद म्हणूनही मिठाची खरेदी करतात. ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा कायम आजही सुरू आहे. येथील मीठ हे थेट गुजरात येथून व्यापारी विक्रीसाठी घेऊन येतात, हे विशेष.

टॅग्स :Socialसामाजिक