शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली कृषी कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 15:55 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणे न उगवल्याने निवेदने देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती.

हिंगोली: जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अधीक्षक कार्यालयात जाऊन तोडफोड करून शेतकऱ्यांना भरपाईची मागणी करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसमत सेनगाव आदी ठिकाणी कृषी विभागाकडे बियाणे न उगवल्याने निवेदने देऊन पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करून आज स्वाभिमानीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयातील साहित्याची आदळआपट करुन नासधूस केली. त्याचबरोबर सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नाही? याबाबतही जाब विचारला. तर लोखंडे यांच्यासमोरच  खुर्च्यांची तोडफोड केली.

यावेळी अधीक्षक विजय लोखंडे यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. लोखंडे यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याने आता उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी मंडळ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्याचा आदेश काढला आहे. जिल्हास्तरीय समितीला एवढ्या सगळ्या तक्रारींवर पाहणी करून निर्णय घेणे शक्य नाही. त्यामुळे मंडळ अधिकारी आता पाहणी करून अहवाल सादर करतील, असेही लोखंडे म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली