लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील कलगाव शेत शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना ६ जानेवारी रोजी उघडकीस आली.हिंगोली तालुक्यातील दिलीप वामन पवार यांनी आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेच्या नोंदीची प्रक्रिया सुरू असल्याचे हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोनि जगदीश भंडरवार यांनी सांगितले.
गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:53 IST