शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका; हळद, केळीचे वाटोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:06 IST

जिल्ह्यात गुरुवारी सकाळीच ढगाळ वातावरण निर्माण होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. सध्या हळद काढणीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांनी हळदीची काढणी करुन शिजवून वाळत घातलेली आहे. मात्र अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात गुरुवारी सकाळीच ढगाळ वातावरण निर्माण होऊन अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. सध्या हळद काढणीचा हंगाम सुरु असून शेतकऱ्यांनी हळदीची काढणी करुन शिजवून वाळत घातलेली आहे. मात्र अवकाळी पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत.हिंगोलीत सोसाट्याच्या वाºयासह दुपारी चार वाजेच्या सुमारास पाऊस झाला. अचानक पावसाला सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जवळपास पाऊनतास रिमझिम पाऊस सुरूच होता. सोसाट्याच्या वाºयामुळे अनेकांच्या घरावरील टीनपत्रे उडाले. वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट जिल्ह्यात पसरली होती अन् त्यात गुरुवारी पाऊस झाला.सवना येथे गारांसह पाऊससवना : सेनगाव तालुक्यातील सवना परिसरातील सवना तांडा, वायचाळ पिंपरी, ब्राह्मणवाडा, सूरजखेडा, चोंडी इ. गावांत ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान गारांसह एक तास पाऊस झाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. हरभºयाच्या आकाराच्या गारांमुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.वादळी वाºयामुळे नुकसान४ कडोळी : सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे ४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता गारांचा पाऊस झाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकºयांची धांदल उडाली. येथील रमतेराम महाराज यांच्या पुन्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन ५ एप्रिल रोजी केले होते. निमीत्ताने भव्य संभामंडप उभारला होता. मात्र वादळी वाºयांमुळे मंडपाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानिमित्ताने येथे एक दिवसाची यात्रा भरते. यात्रेत छोटेमोठे दुकान, पाळणे दाखल झाले आहेत. गारांचा पाऊस व वादळी वाºयामुळे दुकानावरील पत्रे उडाल्याने दुकानदारांची धांदल उडाली आहे.केंद्रा बु. येथे अवकाळीने झोडपले४केंद्रा बु. : येथील परिसरात ४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान वादळी वाºयासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हळद व गहू उत्पादक शेतकºयांची तारांबळ झाली. वादळी वाºयामुळे गोरेगाव ३३ के.व्ही. केंद्रावरील केंद्रा बु. फिडरवर बिघाड झाल्याने १८ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.जवळा बाजार येथे पाऊस४परिसरात ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाला सुरुवात झाली. सध्या परिसरात हळद व ज्वारी काढणीचे काम सुरु आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकºयांची धावपळ उडाली आहे. यंदा अत्यल्प पावसामुळे हळद काढणीचे काम फेब्रुवारीपासूनच सुरू झाले आहे. मात्र दोन दिवसांपासून दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होते व रात्री विजांचा कडकडाट होता.शेतकºयांचे नुकसान४वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा परिसरात ४ एप्रिल रोजी पहाटेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होऊन तुरळक पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. पहाटे ६ वाजेदरम्यान परिसरातील दांडेगाव, रामेश्वर आदी ठिकाणी जोरदार मेघगर्जना झाली तर किरकोळ स्वरूपाच्या पावसाच्या सरीही बरसल्या.अवकाळी पावसाची धास्ती४वसमत : तालुक्यातील हळद उत्पादक शेतकºयांनी वाढते ऊन व पाणीटंचाईच्या संकटामुळे हळद काढण्याची घाई केली; मात्र वाळत घातलेली हळद अवकाळी पावसामुळे भिजण्याच्या भीतीने हळद उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. शेतकºयांनी हळदीची काढणी करुन शिजवली. मात्र हळद शेतामध्ये वाळत असताना अवकाळी पावसाचे संकट ओढावल्याने शेतकºयांनी धास्ती घेतली आहे. दुपारनंतर पावसाच्या सरींनी शेतकºयांची धांदल उडाली.सवड येथे गारांचा पाऊस४हिंगोली : तालुक्यातील सवड येथे ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुसाट्याचा वारा व गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांची मोठी धांदल उडाली.कौठा परिसरात पाऊस४कौठा : वसमत तालुक्यातील कौठा परिसरातील बोराळा, खुदणापूर, किन्होळा, महंमदपूरवाडी आदी भागात ४ मार्च रोजी सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे हळद झाकण्यासाठी शेतकºयांची धांदल उडाली.हळदीचे नुकसान४फाळेगाव : येथील परिसरात विजेच्या कडकडाटासह आरधा ताप जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात वाळण्यासाठी ठेवलेल्या हळदीचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Natureनिसर्गRainपाऊस