शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

अचानक संपामुळे प्रवाशांचे बेहाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 00:53 IST

शासनाने अपेक्षित पगारवाढ दिली नसल्याच्या कारणावरून परिवहन महामंडळाचे कर्मचारी अचानक संपावर गेल्याने गुरुवारी सकाळच्या ८ ते १0 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आगार नियंत्रकांनी फेºया सुरळीत केल्याचे पहायला मिळाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाने अपेक्षित पगारवाढ दिली नसल्याच्या कारणावरून परिवहन महामंडळाचे कर्मचारी अचानक संपावर गेल्याने गुरुवारी सकाळच्या ८ ते १0 बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात आगार नियंत्रकांनी फेºया सुरळीत केल्याचे पहायला मिळाले.राज्यात कर्मचाºयांनी अचानकच हा संप पुकारण्याचा निर्णय घेतला. हिंगोलीतही त्याचे लोण पसरले होते. मात्र यामुळे सकाळच्या वेळच्या ८ ते १0 बसफेºया न झाल्याने प्रवाशांची बोंब वाढू लागली होती. त्यानंतर ९ च्या सुमारास हिंगोली बसस्थानकात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्याचबरोबर या अघोषित व अनधिकृत संपाबाबत प्रशासनानेही चालक-वाहकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक कर्मचाºयांनी पुन्हा कामावर येण्याची तयारी दर्शविली. तर जे कर्मचारी फेºया नेण्यास इच्छुक नाहीत, आज काम करण्यास इच्छुक नाहीत, अशांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे एकेक जण संपातून माघार घेताना दिसत होता. शिवाय कोणत्याही संघटनेने यासाठी पुढाकार घेतलेला नसल्याने पदाधिकारीही पुढे येत नव्हते. त्यामुळे कर्मचाºयांचे बळ अपुरे पडले.याबाबत आगारप्रमुख झरीकर यांना विचारले असता ते म्हणाले, सकाळच्या वेळी काही फेºया रद्द कराव्या लागल्या. मात्र दहा वाजेनंतर सर्व काही सुरळीत सुरू आहे. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही मागविला आहे. सेनगाव व औंढा नागनाथ येथे स्वतंत्र आगार नसल्याने इतर ठिकाणाहून येणाºया बसफेºयांवरच पूर्ण भिस्त आहे. इतरांच्या रद्द झालेल्या तेवढ्या फेºया रद्द झाल्याचे चित्र होते.वसमतला सहभाग नाहीपरिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी पुकारलेला संप वसमतमध्ये पहायला मिळाला नाही. त्यामुळे या आगारातून सर्व बसफेºया सुरळीत सुरू असल्याचे चित्र होते.कळमनुरी आगारातील कर्मचारी, चालक, वाहकांनी मात्र संपात पूर्णपणे सहभाग नोंदविल्याने दुपारपर्यंत केवळ पाचच बस आगाराबाहेर पडल्या. दिवसभरात येथून १८८ बसफेºया होतात. दुपारनंतर चित्र बदलेल. कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर येतील, अशी माहिती आगारातून देण्यात आली. येथे चालक ७१ व वाहक ७४कार्यरत असून यांचाच संपात सहभाग आहे. प्रशासकीय व यांत्रिकी कर्मचारी मात्र कर्तव्यावर आहेत. येथून बसफेºया जात नसल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. याचा फायदा मात्र खाजगी वाहनांना मोठ्या प्रमाणात झाला.बस कर्मचाºयांच्या संपामुळे रस्त्यावर बस धावल्याच नसल्याने मात्र तालुक्यातील अनेक खेड्या-पाड्यांतील लोकांना खाजगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला. यातही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीST Strikeएसटी संप