शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अशीही कुरघोडी ! कार्यालयाची वीज तोडताच महसुलचा दणका;वीजवितरणची ३ कार्यालये सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 18:55 IST

विद्युत पुरवठा खंडित असल्याने आज दिवसभर तहसिल कार्यालयाचे कामकाज ठप्प होते.

वसमत: वीज बिलापोटी ७ लाख ४५ हजार थकल्याने वीजवितरण कंपनीने रविवारी तहसिल कार्यालयाची वीज जोडणी तोडली. तर आज ९ लाख ५४ हजाराचा अकृर्षीक कर थकल्याने महसुलने दणका देत वितरणच्या तिन्ही कार्यालयास सिल ठोकले आहे. दोन्ही विभागाने जशास तसे उत्तर दिल्याने शासकीय कार्यालयांच्या कुरघोडीची शहरात दिवसभर चर्चा होती.

वसमत शहरासह ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने थकीत बिलापोटी वसुली करण्यावर भर दिला आहे.तसेच तहसिल विभाग अकृर्षीक कराची वसुलीभर देत आहे.तहसिल कार्यालयाकडे वीजबिला पोटी ७ लाख ४५ हाजार वितरणचे थकले होते तर वितरणचे शहर कार्यालय, ग्रामीण, वरिष्ठ अभियंता या तिन कार्यालयाकडे एकूण ९ लाख ५४ हाजार अकृर्षीक कर थकला आहे. महसुल विभागाने १५ दिवसांपूर्वी वितरणला अकृर्षीक कर भरणा करण्या संदर्भात नोटीसा बजावल्या होत्या. त्यानंतर वीजवितरण कंपनीच्या वसुली पथकाने २७ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. आज दिवसभर तहसिल कार्यालयाचे कामकाज विजेअभावी ठप्प होते.

दुसरीकडे ही कारवाई जिव्हारी लागल्याने महसुलनेही वीजवितरण कंपनीला चांगलाच दणका दिला.२८ फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आर काळे, प्रियंका खडसे, तलाठी एस बोबडे यांनी ९ लाख ५४ हजाराच्या अकृर्षीक करापोटी वितरणच्या शहर अभियंता कार्यालय, ग्रामीण कार्यालय आणि वरिष्ठ अभियंता यांच्या कार्यालयास सिल ठोकले.

वीज वितरण कंपनी च्या तिन्ही कार्यालयाकडे ९ लाख ५४ हाजाराचे अकृर्षीक कर थकले आहे.१५ दिवसा पुर्वी करा संदर्भात नोटीसा बजावण्यात येऊन देखील वितरण गांभीर्य घेत नव्हते. यामुळे आज तिन्ही कार्यालयास सिल ठोकण्यात आले.- आर बी काळे, मंडळ अधिकारी, वसमत

वीजवितरण कंपनी शहरासह ग्रामीण भागात विद्युत बिलाची वसुली करत आहे. तहसिल कार्यालयाकडे ७ लाख ४५ हाजार थकले आहे.विद्युत बिलापोटी रविवारी कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.- सचिन गच्चे, शहर अभियंता, वीज वितरण, वसमत

टॅग्स :HingoliहिंगोलीRevenue Departmentमहसूल विभाग