शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालय बनले तपासणी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:18 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयावर कोट्यावधी रुपये खर्च करुन देखील उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची दुरावस्था झली आहे. परिसरातील चारशे ते पाचशे गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र मागील पाच वर्षांपासून रुग्णालयातील सर्वच उपयोगी साहित्य मोडकळीस आले आहे. परिणामी, रुग्णालय केवळ शिबिराच्या रूपात तपासणी केंद्र म्हणूनच चालले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथील उपजिल्हा रुग्णालयावर कोट्यावधी रुपये खर्च करुन देखील उपजिल्हा रुग्णालयातील साहित्याची दुरावस्था झली आहे. परिसरातील चारशे ते पाचशे गावातील ग्रामस्थांना आरोग्य सेवा देण्यासाठी या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र मागील पाच वर्षांपासून रुग्णालयातील सर्वच उपयोगी साहित्य मोडकळीस आले आहे. परिणामी, रुग्णालय केवळ शिबिराच्या रूपात तपासणी केंद्र म्हणूनच चालले आहे.एकेकाळी वसमत चे उपजिल्हा रुग्णालय औंढा, वसमत तालुक्यासाठी मोठे वरदान ठरलेले रुग्णालय होते परंतु आता येथील शस्त्रक्रिया केंद्र , एक्स-रे केंद्र रक्तपेढी, पॅथॉलॉजी बंदच आहेत. औषधींचा खडखडाट असून दवाखान्यात पिण्याचे पाणी तर नाहीच शिवाय परिसरातही प्रचंड प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. रुग्णालयातील सर्व शौचालय बंद असल्याने रुग्णालय परिसरात रुग्णासह नातेवाईकांची गेल्या अनेक दिवसांपासून कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. या रूग्णालयात आंतर रूग्णांसाठी तीन वार्डची व्यवस्था करण्यात आली असली तरी रुग्णालयातील असुविधेमुळे सध्या केवळ एकच वार्ड वापरात आहे. शिवाय वार्ड क्रमांक २ व ३ चे लॉक कधीच काढलेले आढळत नसून ते नेहमीच बंद असते.रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरजू रूग्णांना औषध मिळतच नाही, तर केवळ सल्ला दिला जातो किंवा नांदेड सारख्या रुग्णालयात रेफर केले जात असल्याने या रुग्णालयाची अवस्था रामभरोसे असल्याचे चित्र आहे. रुग्णालयातील अस्वच्छता, असुविधा यासंदर्भात अनेक वेळा नागरिक तक्रारी करतात. परंतु रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत कधीच दखल जात नाही. रुग्णालयातील कर्मचाºयांसोबत अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांचे वादही होतात. परंतु रुग्णालय प्रशासनाने कधीच याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, हे विशेष. केवळ आॅनलाईन सुविधा, टेंडरिंग, वरिष्ठ यंत्रणेच्या हातात आहे. अशी कारणे सांगूनच वेळ मारून नेली जात असून येथील सुविधे विषयी कुणालाही गरजच राहिली नाही. येथे अतिशय गरीब, निराधार, रूग्ण उपचार घेण्यासाठी येतात. त्यांच्याकडे औषधी करीता पैसेही नसतात.अशावेळी रुग्णासोबत आलेल्यांचा कर्मचाºयांशी वाद होत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा सपाटा चालू असून त्यावर ठोस उपाय करण्यात रुग्णालय प्रशासन अपयशी ठरत आहे. रूग्णालयीन अधीक्षकासह यंत्रणेतील जबाबदार घटक व वरिष्ठांनी रुग्णालयातील सुविधा सुरळीत कराव्यात, औषधांची उपलब्धता करावी आणि रुग्णालयाचा दर्जा उत्तम ठेवण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य