शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबेल; प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली : एस. टी. प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रत्येक बसची लाइव्ह वेळ कळावी, यासाठी ‘व्हीटीएस’ सिस्टीम बसविण्यात येणार आहे. यासाठी ...

हिंगोली : एस. टी. प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रत्येक बसची लाइव्ह वेळ कळावी, यासाठी ‘व्हीटीएस’ सिस्टीम बसविण्यात येणार आहे. यासाठी विभागीयस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती हिंगोली आगारप्रमुख पी. बी. चौतमल यांनी दिली.

हिंगोली आगारात सद्य:स्थितीत ६३ बस आहेत. सर्वच बसला ‘व्हीटीएस’ यंत्र बसविण्यात आले आहे. सध्या तरी विभागीयस्तरावर याची तपासणी करण्यात येत आहे. ही ‘व्हीटीएस’ मशीन चालकाच्या बाजूला बसविण्यात आलेली आहे. चालक-वाहकांचे लोकेशन, बसचे लोकेशन या ‘व्हीटीएस’ (व्हेकल ट्रॅकिंग सिस्टीम) पद्धतीमुळे समजणार आहे. हिंगोली आगारात ‘व्हीटीएस’करिता स्वतंत्र अशी खोली करण्यात आली असून त्या ठिकाणी संगणकही बसविण्यात आले आहे. या संगणावर सर्व माहिती सहजरीत्या उपलब्ध होऊ शकते. चालक-वाहकांचा डाटाही या संगणकात फीड करून ठेवण्यात आला आहे.

विभागीयस्तरावर सर्व नियंत्रण

हिंगोली आगारातील ६३ बसला व्हीटीएस बसविण्यात आले आहे; परंतु प्रवाशांसाठी ही सुविधा अजून उपलब्ध करून दिलेली नाही. अजून तरी या मशीनबाबत विभागीय स्तरावर तपासणी सुरू आहे. विभागीयस्तरावरून सूचना आल्यास मोठे स्क्रीनही बसस्थानकात लावले जातील. म्हणजे प्रवाशांना बस कुठे आहे, किती वेळात येईल, कुठे बिघडली आहे काय, याची माहिती कळू लागेल.

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

बसचे चालक कुठे थांबत आहेत, बस किती वेगाने चालवीत आहेत, कोणत्या थांब्यावर कितीवेळ थांबत आहेत? ही माहिती या व्हीटीएस मशीनद्वारे कळू शकणार आहे. याचबरोबर चालक-वाहकांना कुठेही थांबता येणार नाही. आगारातून दिलेली वेळ पाळून प्रवाशांची सेवा करावी लागणार आहे. कित्येक वेळा प्रवाशांच्या प्रश्नालाही उतरे द्यावी लागणार आहेत.

सध्या जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत या तिन्ही आगारांनी जवळपास सर्वच मार्गांवर बस सुरू केल्या आहेत; परंतु आजमितीस प्रवाशांना बसची वाट पाहावी लागत आहे. अशा वेळी चालक-वाहक वेगवेगळी कारणे देऊन प्रवाशांना निरुत्तर करतात. चालक-वाहक सांगतील तेच कारण प्रवाशांना मान्य करावे लागत आहे. येत्या काळात व्हीटीएस पद्धतीमुळे चालक-वाहकांना खोटे बोलता येणार नाही. व्हीटीएसमुळे बस कुठे आहेत, कोणत्या ठिकाणी किती वेळ थांबतात? याची माहिती कळणार आहे.

व्हीटीएस पद्धतीमुळे अनियंत्रित वेगाची नोंद होते. अनियंत्रित वेगही लवकर लक्षात येतो. वाहन परीक्षक विभागात इंटरनेट कनेक्शन दिले आहे. या विभागात सर्व चालक-वाहकांची नोंदही करून ठेवली आहे. लवकरच व्हीटीएस पद्धत प्रवाशांना कळविली जाणार आहे.

-पी. बी. चौतमल, आगारप्रमुख