शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ठिकाणी चोरीच्या घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:58 IST

बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत वेगवेगळ्या कारणाने दोघांचा मृत्यू झाला. एका ठिकाणी १० क्विंटल हळद चोरीला गेली तर एका आखाड्यावरून दुचाकी चोरीस गेली आहे. तर एका दुचाकीस्वारास जीपने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. या विविध घटनेप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी घडलेल्या घटनांत वेगवेगळ्या कारणाने दोघांचा मृत्यू झाला. एका ठिकाणी १० क्विंटल हळद चोरीला गेली तर एका आखाड्यावरून दुचाकी चोरीस गेली आहे. तर एका दुचाकीस्वारास जीपने उडविल्याने तो गंभीर जखमी झाला. या विविध घटनेप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.विषारी द्राव्य प्राशन केल्याने एकाचा मृत्यू- कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील गजानन कदम यांचे शेतात राहणाऱ्या व कोपरवाडी येथील संगीता राजू डाखोरे (२६) या महिलेने २२ मे रोजी सकाळी ११ वाजता कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले. डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार दिले. पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले. नांदेडच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना २७ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता तीचा मृत्यू झाला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार आर.जे. बायस यांच्या खबरीवरून बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार वडकिल्ले करीत आहेत.दुचाकी लंपासबेलमंडळ येथील माणिक फकिरा मुधोळ यांच्या शेतातील आखाड्यावरील घरासमोर उभी असलेली दुचाकी क्र. एम.एच.३८, एच. ११५६ ही दि. १७ मे रोजी रात्री १२ वाजेनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी बाळापूर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास एएसआय नागनाथ दीपक करीत आहेत.जीपच्या धडकेत एक जखमीहिवरा येथील किशनराव गणपतराव कदम (५०) हे २९ मार्च रोजी आर्धापूर येथून खासगी काम करून दुचाकीने गावाकडे परत येत होते. हिवरा पाटीजवळ आले असता जीप क्र. एम.एच.३८- ५४२२ च्या चालकाने जीप निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक दिल्याने या अपघातात कदम जखमी झाले होते.१० क्विंटल हळदीची चोरी४ कळमनुरी तालुक्यातील कुर्तडी शिवारातील बाळासाहेब अबनराव पानपट्टे यांनी त्यांच्या शेतात हळद ढोल करून खताच्या रिकाम्या पोत्यात २४ कट्टे हळद अंदाजे १० क्विंटल भरून ठेवली होती. १४ मे रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. या प्रकरणी २८ मे रोजी बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार कांबळे करीत आहेत.युवकाचा मृत्यू - घोडा येथील युवक बाळू यादवराव पतिंगराव (२१) हा २१ मे रोजी आपले राहते घरासमोर रात्री ८ वाजता पडला. यात तो जखमी झाला. बाळापूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार दिल्यानंतर त्याला नांदेडच्या सरकारी दवाखान्यात उपचारकामी हलविले. नांदेड येथे उपचार सुरू असताना २७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. यादवराव जळबाराव पतिंगराव रा. घोडा यांच्या खबरीवरून बाळापूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcrimeगुन्हे