शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटीत’ वायफाय सुविधा नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:18 IST

महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचा प्रवास आनंददायी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यसाठी राज्य परिवहनने बसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘वायफाय’ सेवा सुरू केली. मात्र सध्या बसमध्ये बसविण्यात आलेले वायफायचे हे डबे बंद की सुरू, हेच कळायला मार्ग नाही. प्रवासीही संभ्रमात असून संबधित आगारप्रमुखांनाही सुविधेबाबत माहिती नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचा प्रवास आनंददायी करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. प्रवाशांना आकर्षित करण्यसाठी राज्य परिवहनने बसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘वायफाय’ सेवा सुरू केली. मात्र सध्या बसमध्ये बसविण्यात आलेले वायफायचे हे डबे बंद की सुरू, हेच कळायला मार्ग नाही. प्रवासीही संभ्रमात असून संबधित आगारप्रमुखांनाही सुविधेबाबत माहिती नाही.राज्य परिवहनन महामंडळाच्या परभणी विभागीय कार्यालयाअंतर्गत हिंगोली, कळमनुरी, वसमत तसेच जिंतूर, गंगाखेड, पाथरी व परभणी एकूण सात डेपोचा सामावेश आहे. विभागात एकूण ४४७ बसेस आहेत. बस प्रवास प्रवाशांना कंटाळवाना वाटू नये, यासाठी महामंडळाने बसेसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध केली. परंतु अनेक बसमधील वायफायची सिस्टिमच काम करत नाही. शिवाय कनेक्टीव्हीटीच नसल्यामुळे सुविधेचा वापर करता येत नसल्याची प्रवाशांतून ओरड आहे. या सुविधेचे कंत्राट एका खाजगी कंपनीला दिले आहे. संबधित एजन्सी चालकाने बसमधील वायफाय सिस्टीम सुरू आहे, किंवा त्यात बिघाड झाला आहे का, याबाबत शहानिशा करणे गरजेचे आहे. परंतु असे होताना मात्र कुठे दिसत नाही. प्रवाशांनी वायफाय कसे कनेक्ट करावे, याचे बॅनर मात्र प्रत्येक बसध्ये डकविण्यात आलेले आहेत.हिंगोली डेपोतील जवळपास ४० बसेसमध्ये वायफायची सिस्टिम बसविल्याचे सांगितले जात आहे. बसमधील वायफाय सुविधेची सिस्टिम सुरू असल्याचे आगारप्रमुख बी. बी. झरीकर यांनी सांगितले. परंतु एकत्रित माहिती किंवा दुरूस्तीबाबत संबंधित एजन्सी चालकाकडेच माहिती भेटू शकले असे ते म्हणाले. त्यामुळे महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाने मोठ्या गाज्यावाज्यात सुरू केलेल्या या सुविधेचा प्रवाशांना उपयुक्त ठरत आहे का, हे सांगणे कठीण आहे.वायफाय सुविधेबाबत परभणी येथील विभाग नियंत्रक जालिंदर सिरसाट दूरध्वनीवरून संपर्क केला असता, ते म्हणाले बसमध्ये वायफाय सिस्टिम बसविलेल्या आहेत. परंतु यातील कोण-कोणत्या बसमध्ये ही सुविध सुरू आहे, याची माहिती संबधित एजन्सीधारकांनाच माहीत असते.असे त्यांनी सांगितले. संबधित एजन्सी चालकास संपर्क केला असता, याची एकत्रित आकडेवारी काढण्यात आली नाही. पाच ते सहा जिल्ह्यांतील कामकाज पहावे लागते. त्यामुळे सध्या विभागातील किती बसमधील वायफाय सुविधा सुरू आहे, हे सांगणे कठीण आहे.राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्या बसमध्ये वायफाय सुविधेचे बॉक्स बसविलेले आहेत. त्याच ठिकाणी या सुविधेचा वापर करण्याची जागो-जागी माहिती फलक आहेत.

टॅग्स :Hingoliहिंगोलीstate transportराज्य परीवहन महामंडळ