शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

आजपासून व्याख्यानमालेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:19 IST

मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या वतीने गेल्या १९ वषार्पासून राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केल्या जाते. यावर्षीही व्याख्यानमाला ३ ते ५ जानेवारी दरम्यान दररोज संध्याकाळी ८ वाजता हिंंगोली येथील ग्यानबाराव सिरसाठ विचारमंच महावीर भवनमध्ये संपन्न होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या वतीने गेल्या १९ वषार्पासून राष्ट्रमाता जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केल्या जाते. यावर्षीही व्याख्यानमाला ३ ते ५ जानेवारी दरम्यान दररोज संध्याकाळी ८ वाजता हिंंगोली येथील ग्यानबाराव सिरसाठ विचारमंच महावीर भवनमध्ये संपन्न होणार आहे.३ जानेवारी रोजी जिजाऊ व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पात ‘स्त्रीमुक्ती; गप्पा की वास्तव?’ या विषयावर प्रसिद्ध विचारवंत लेखिका प्रा. मनीषाताई रिठ्ठे यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई चव्हाण तर उदघाटक वन अधिकारी मनीषा पाटील, प्रमुख अतिथी म्हणून कर सहाय्यक अधिकारी कांचन मुटकुळे, अ‍ॅड. सुनीता देशमुख, वर्षा सरनाईक आदींची उपस्थिती राहणार आहे. ४ जानेवारी रोजी छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीचा आदर्श व वर्तमान लोकशाहीचा परामर्श या विषयावर डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश प्रवक्ता प्रविण देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे तर उदघाटक कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, वन परिक्षेत्र अधिकारी गणेश झोळे, परभणी तालुका कृषि अधिकारी रामचंद्र तांबीले, बाबाराव श्रृंगारे आदींची उपस्थिती राहणार आहे. ५ जानेवारी रोजी युवा महाराष्ट्र नव महाराष्ट्र या विषयावर लेखक, कवि, स्तंभलेखक ज्ञानेश वाकोडकर नागपूर यांचे मार्गदर्शन होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, उदघाटक म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुधाकर घुबडे, प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, मारोतराव बुद्रुक पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक