शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘एकच मिशन मराठा आरक्षण’ च्या घोषणा देत एसटी बसेस पाठविल्या परत

By रमेश वाबळे | Updated: March 10, 2024 13:12 IST

हिंगोलीत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम; मराठा समाजबांधवांनी व्यक्त केला संताप

रमेश वाबळे

हिंगोली : मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याऐवजी राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत मराठा समाजबांधवांनी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाकरीता ग्रामीण भागातील लाभार्थी, नागरिकांना आणण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एसटी बसेस २० ते २५ गावांतून परत पाठविल्या. यादरम्यान मराठा समाजबांधवांनी ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ अशा घोषणाही दिल्या.

हिंगोली शहरातील रामलीला मैदानावर १० मार्च रोजी  दुपारी ३ वाजता ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी प्रशासनातील अधिकारी मागील आठवड्यापासून करीत असून, कार्यक्रमास गर्दी जमावी यासाठी विविध योजनांचे लाभार्थी, नागरिकांना आणण्याकरीता महामंडळाच्या हिंगोली जिल्ह्यासह परजिल्ह्यातील आगारांतील ३०० बसेस तसेच खासगी ४०० वाहने ठेवण्यात आली आहेत.

एसटी महामंडळाच्या बसेस ठरल्याप्रमाणे सकाळी १० वाजेच्या सुमारास ग्रामीण भागातून नागरिकांना आणण्यासाठी सोडण्यात आल्या. परंतु, मराठा आरक्षणप्रश्नावरून अनेक गावात या बसेसमध्ये कोणीही न बसता रिकाम्या परत पाठविण्यात आल्या.

गुगुळ पिंपरी, चुंचा, आसेगाव, वारंगा फाटा, कृष्णापूर, गिरगाव, पुसेगाव, कुरूंदा, डोंगरकडा, खांडेगाव, उमरा, निशाणा, नर्सी नामदेव, वडद, आंबाळा, कडती, लोहगाव, हानवतखेडा आदी गावातून या बसेस परत पाठविण्यात आल्या. यादरम्यान मराठा समाजबांधवांनी संताप व्यक्त केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी आंदोलन केले. मात्र, शासनाचे त्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाच्या प्रचाराची गाडी येऊ देणार नाही, असा निर्णय घेत तुम्ही गावातून बस बाहेर न्यावी अशी विनंती चालकांना करण्यात आली. त्यामुळे या गावातून लाभार्थी, नागरिकांना आणण्यासाठी गेलेल्या बसेस रिकाम्याच आल्या.