शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचे ब्रेक निकामी; पाच प्रवासी जखमी

By admin | Updated: June 24, 2014 00:10 IST

वसमत : वसमत - नांदेड राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या वसमत आगाारच्या एसटीचे ब्रेक अचानक निकामी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने शहरात सुरू असलेल्या मतदार नोंदणी मोहिमेस नागरिकांचा अल्प प्रतिसाद लाभला. बहुतांश मतदान केंद्रांवर दुसऱ्या दिवशीही शुकशुकाटच असल्याने संबंधित कर्मचारी अक्षरश: बसून होते, तर काही ठिकाणी मतदारांचा तुरळक प्रतिसाद दिसून आला. विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवार व रविवार असे दोन दिवस मतदार नोंदणी व नाव-पत्ता दुरुस्तीची विशेष दुरुस्ती मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक मतदारसंघातील मतदान केंद्रांवर केंद्रस्तरीय अधिकारी व शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत मोहीम सुरू होती; मात्र दोन्ही दिवस या मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद लाभू शकला नाही. नाशिकरोड, पंचवटी, सिडको परिसरातील केंद्रांवर वर्दळ दिसत नव्हती. बी. डी. भालेकर शाळेतही कर्मचारी मतदारांअभावी बसून होते. तेथे दिवसभरात सुमारे ७० व्यक्तींनी मतदार नोंदणी अर्ज दिले. इंदिरानगर येथील सुखदेव शाळेत दोन्ही दिवस मिळून १२५, स्वामी विवेकानंद विद्यालयात १००, तर राणेनगरच्या जाजू विद्यालयात १३० अर्ज नागरिकांनी भरून दिले. पंचवटीतील आरपी विद्यालयातही तुरळक मतदारांची नोंदणी झाली. (प्रतिनिधी)